ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज जिल्हा जळगाव तालुका भडगाव धनराज पाटील यांची मराठा महासंघाच्या जिल्हा प्रमुख पदी निवड// तर दुसरीकडे संत सावता माळी महाराज पुण्यतिथीनिमित्त प्रतिमा मिरवणूक, गुणगौरव व महाप्रसाद सोहळा उत्साहात साजरा


भडगाव/प्रतिनिधी विजय माळी
संत सावता माळी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळी पंच मंडळ व महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रतिमा मिरवणूक, गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. यावेळी समाजबांधवांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.सकाळी शहरातील शनी चौक येथे संत सावता माळी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन सचिव विनोद महाजन व माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर वाद्यवृंदाच्या गजरात पुरुष व महिला भजनी मंडळींच्या सहभागाने प्रतिमा मिरवणूक काढण्यात आली. भजन, कीर्तन व जयघोषामुळे शहरातील वातावरण भक्तिमय झाले होते. शनी चौक, बाजारपेठ, खोल गल्ली, मेन रोड मार्गे मिरवणूक कै. लक्ष्मणभाऊ मंगल कार्यालय येथे पोहोचून समारोप करण्यात आला यानंतर माळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष मालचे, पोलीस निरीक्षक महेश टाक, माळी पंच मंडळाचे अध्यक्ष मनोज महाजन, महात्मा फुले बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव विनोद महाजन, बालविकास संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब महाजन, उपनगराध्यक्ष राजेंद्र पाटील, गटनेता लाखिचंद पाटील, नगरसेवक अलीम शहा, हाशिम मिर्झा, जगनभाई, देवा अहिरे, इम्रान सय्यद, अमोल पाटील, सचिन चोरडिया, जितेंद्र पाटील, मुरलीधर भील, विजय भोसले, शशी वाणी, डॉ. प्रमोद पाटील, राहुल ठाकरे, संतोष महाजन, चर्मकार महासंघाचे अध्यक्ष रवी अहिरे, नगरसेविका योजनाताई पाटील, वैशाली महाजन आदींच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी ज्येष्ठ समाजसेवक तथा पत्रकार शिवदास महाजन, पत्रकार अशोक परदेशी नाभिक महामंडळाचे तालुकाध्यक्ष संजय पवार, माळी पंच मंडळाचे माजी अध्यक्ष मुकुंद महाजन, गोविंद महाजन, अनिल महाजन, माळी पंच मंडळाचे सचिव डॉ. प्रकाश बच्छाव यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भिकन महाजन, डॉ. प्रकाश बच्छाव, मनोज महाजन, गणेश महाजन, गोकुळ महाजन, सागर महाजन, अनिल महाजन, अॅड. विजय महाजन, आबा महाजन, विकास महाजन,शिवदास महाजन, शुभम महाजन, अशोक महाजन, मुकुंद महाजन, रमेश महाजन, सुनील महाजन रावसाहेब महाजन बबलू महाजन, विजय माळी,देवराम महाजन, रवी महाजन आदींनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रवीण महाजन यांनी केले. प्रास्ताविक साहेबराव महाजन यांनी केले, तर आभार नितीन महाजन यांनी मानले.
तालुक्यातील पिचर्डे येथील युवा पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते धनराज पाटील यांची अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. महासंघाचे जळगाव जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप भिकनराव पाटील यांनी त्यांना निवडपत्र देऊन ही जबाबदारी सोपविली आहे.धनराज पाटील हे गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक प्रश्न, शेतकरी, सर्वसामान्य नागरिक तसेच ग्रामीण भागातील विविध समस्या प्रभावीपणे मांडण्याचे कार्य करीत आहेत. समाजातील उपेक्षित घटकांच्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासह विविध सामाजिक उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे पत्रकारितेबरोबरच निसर्ग मित्र समितीच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन व सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. वृक्षसंवर्धन, पर्यावरण जनजागृती, स्वच्छता तसेच निसर्गाच्या संरक्षणा संदर्भातील उपक्रमांमध्ये त्यांनी जबाबदारीने योगदान दिले आहे. त्यामुळे सामाजिक व पर्यावरणीय क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय मानले जाते.
अखिल भारतीय मराठा महासंघाच्या जळगाव जिल्हा प्रसिद्धी प्रमुखपदाची नवीन जबाबदारी मिळाल्याने महासंघाच्या सामाजिक, शैक्षणिक, संघटनात्मक व समाजोपयोगी उपक्रमांची माहिती प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोच विण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू, अशी भावना धनराज पाटील यांनी व्यक्त केली.या निवडीबद्दल भडगाव तालुक्या सह जळगाव जिल्ह्यातील मित्र परिवार, सामाजिक कार्यकर्ते पत्रकार बांधव व विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून धनराज पाटील यांचे अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button