मुंबई बीएमसी सहाय्यक आयुक्तांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अभिनेत्याच्या पत्नीची 16 कोटीची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात 16 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकी प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून त्यांना व त्यांच्या साथीदारांना अटक झालेली आहे

मुंबई बीएमसी सहाय्यक आयुक्तांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा अभिनेत्याच्या पत्नीची 16 कोटी ची तक्रार बृहन्मुंबई महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांच्या विरोधात 16 कोटी रुपयांच्या कथित फसवणुकी प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे अभिनेता जावेद जाफरी ची पत्नी हबीबा जाफरी तक्रार दिली असून पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचा आरोप केला आहे या प्रकरणात महेश पाटील यांच्यासह व्यावसायिक निशीत पटेल रुपेश सागर मेहता देवेंद्र पडवळ यांच्यासह अनेक जणांवर गुन्हा दाखल झाला आहे मोठ्या आर्थिक व्यवहाराचा संबंध असल्याने हा तपास मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या प्रॉपर्टी सेल विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे तक्रारीनुसार पश्चिम वांद्रे येथील पुनर्विकास प्रकल्पात मोठा फायदा होणार असे सांगितल्यावर गुंतवणुकीस प्रवृत्त करण्यात आले महेश पाटील यांनी या प्रकरणाची माहिती देत गुंतवणुकीस प्रवृत्त केले महेश पाटील यांनी गुंतवणूक करण्यासाठी प्रोत्साहन दिले त्या आरोपांनुसार महेश पाटील यांनी जावेद जाफरी यांना ना घर दिले आणि पैसे परत दिले नाही असा आरोप जावेद जाफरी यांची पत्नी हबीबा जाफरी यांनी केला आहे पोलिसांच्या प्राथमिक तपासात आरोपींनी बनावट सरकारी नोंदणी कागदपत्राचा वापर करून अनेक बनावट कागदपत्र तयार करून प्रतिष्ठित गुंतवणूकदारांना लालूच दाखवण्यात यश मिळवले आहे पोलिसांच्या म्हणण्यानुसार तक्रारदाराकडून चेक रोख रक्कम विदेशी चलन आणि महागड्यां घड्याळाचा स्वरूपात सुमारे16 ते 24 कोटी रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे या प्रकरणात जावेद जाफरी काही निवृत्त पोलिस अधिकारी सिनेमा कलाकार बीएमसी रिटायर अधिकारी रिटायर न्यायाधीश अधिकारी यांच्यासह मोठमोठे उद्योगपती व काही गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणावर रक्कम दिल्याची प्राथमिक चौकशी च्या आधारे पोलिसांना माहिती मिळाली यापूर्वीही महेश पाटील यांच्यावर खंडणी दाखल झाली होती आणि त्यांना मारहाण सुद्धा झाली होती सन 2025 मध्ये महेश पाटील यांच्यावर कार्यवाही करण्यात आली होती त्यानंतर महेश पाटील यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते आता परत त्यांच्या नावाने गुंतवणूकदारांना लालूच दाखवून यांना फसवण्यात आले या फसवणुकीच्या प्रकरणामुळे महेश पाटील सध्या चर्चेत आहे शासन प्रशासन यांच्यावर काय कार्यवाही करणार मुंबईच्या जनतेचे लक्ष लागून आता सध्या खरेदी प्रकरणात फसवणूक जास्त होत असल्याने रजिस्टर खरेदी ऑनलाइन करावी








