जिल्हा जळगाव महानगरपालिकेतर्फे प्रभाग 7 मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव: निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रभाग 7 मधील नागरिकां साठी दोन दिवसीय विशेष माहिती संकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. महापौर दीपमाला काळे

जिल्हा जळगाव महानगरपालिकेतर्फे प्रभाग 7 मध्ये मतदार यादी अद्ययावत करण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद जळगाव:निवडणूक आयोगाच्या ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेअंतर्गत मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी प्रभाग 7 मधील नागरिकांसाठी दोन दिवसीय विशेष माहिती संकलन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कॉलनीतील दत्त मंदिर येथे शनिवार, 28 मार्च आणि रविवार, 29 मार्च रोजी हे शिबिर पार पडत आहे. शनिवारी सकाळी शिबिराला सुरुवात झाली या मोहिमेअंतर्गत विशेषतः घरातील सुुनेच्या माहेरच्या (आई-वडिलांच्या) 2002 मधील तपशिलांची नोंदणी केली जात आहे. मतदार यादीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी माहिती तयार ठेवण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.आवश्यक माहितीआई-वडिलांचे पूर्ण नाव.2002 मधील वास्तव्याचे ठिकाण (गाव, तालुका व जिल्हा).संबंधित विधानसभा मतदारसंघाचे नाव व क्रमांक.मतदार यादीतील भाग क्रमांक व अनुक्रमांक.शनिवारी सकाळी शिबिराचा प्रारंभ झाला असून दिवसभर नागरिकांसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी आ. राजूमामा भोळे, महापौर दीपमाला काळे, स्थायी समिती सदस्य विशाल भोळे, नगरसेवक चंद्रशेखर अत्तरदे आणि नगरसेविका अंकिता पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रभागातील सर्व लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष उपस्थित राहून नागरिकांना माहिती देण्याचे व प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आवाहन केले.ज्या नागरिकांनी अद्याप आपली माहिती दिलेली नाही, त्यांनी रविवारी (२९ मार्च) दत्त मंदिर, गणेश कॉलनी येथे उपस्थित राहून आपले सहकार्य नोंदवावे. मतदार यादी अद्ययावत करणे हे आपले कर्तव्य असून, यामुळे भविष्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक सुलभ होणार आहे, असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.









