ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा शिंदे गट शिवसेना तालुका प्रमुख राजेंद्र पाटील यांची ग्रामीण मार्ग वर्गासाठी धडाकेबाज धुरंदर कामगिरी…पाचोरा प्रतिनिधी


तालुक्यातील पिंपळगाव (हरे) – जरंडी रस्त्याच्या दुरवस्थेबाबत व प्रशासकीय गोंधळ दूर करण्यासाठी दिनांक २१ व २३/०३/२०२६ रोजी मा. तहसीलदार, पाचोरा यांना पाठपुरावा निवेदन ईमेल सादर करण्यात आले.सदर रस्ता हा प्रामुख्याने पिंपळगाव व जरंडी या दोन गावांना जोडणारा स्थानिक वापराचा मार्ग असून सध्या तो राज्य महामार्ग व ग्रामीण मार्ग अशा दोन्ही प्रकारे नोंद झाल्यामुळे रस्त्याच्या विकासकामांमध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. तसेच रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने ग्रामस्थांना दैनंदिन वाहतुकीत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.तांत्रिक अडचण व त्याची प्रक्रिया म्हणजे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता व तहसीलदार व टीम यांच्या संयुक्त पाहणी (Joint Inspection) अहवाल तयार करून तो मा. जिल्हाधिकारी मार्फत राज्य शासनाकडे पाठविला जावा, त्यानंतर रस्त्याचे ग्रामीण मार्ग म्हणून वर्गीकरण (मार्गक्रम) करण्यात यावे.
रस्त्याचे योग्य वर्गीकरण झाल्यानंतर लोकप्रतिनिधी/आमदार साहेबांकडून DPR सादर केला जाईल. त्यानंतर निधी मंजूर होऊन टेंडर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर रस्त्याचे पक्क्या स्वरूपात डांबरीकरण व विकासकाम हाती घेतले जाईल.म्हणूनच तातडीने संयुक्त पाहणी करून रस्त्याचे योग्य वर्गीकरण निश्चित करावे व पुढील कार्यवाही गतीने करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पिंपळगाव–जरंडी रस्त्याच्या प्रशासकीय गुंतागुंतीच्या पार्श्वभूमीवरही कार्यसम्राट लोकप्रतिनिधी/आमदार साहेब किशोर आप्पा पाटील यांनी एक कोटी रुपयांचा निधी विकासासाठी मंजूर करून दिला, याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.हा रस्ता प्रशासकीय स्तरावर न सुटणारा गुंता निर्माण झालेला असतानाही, अशा कामांमध्ये मार्ग काढण्याचे कौशल्य वस्ताद आप्पासाहेबांनी यापूर्वीही दाखवून दिले आहे. तारखेडा–लोहटार असो किंवा आताच्या पहाण ते लाख शिवारातील रस्त्याचे उदाहरण असो, त्या रस्त्याचे योग्य वर्गीकरण करून त्याला पक्क्या स्वरूपात डांबरीकरणाची मंजुरी देत अत्यंत चांगल्या दर्जाचा रस्ता निर्माण करण्यात आला.या प्रक्रियेदरम्यान स्थानिक नागरिकांनी संयम आणि धीर राखत प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण होण्याची वाट पाहिली आणि त्याचा परिणाम म्हणून त्यांना कायमस्वरूपी दर्जेदार रस्ता उपलब्ध झाला.त्याच धर्तीवर पिंपळगाव–जरंडी रस्त्याबाबतही सकारात्मक आणि प्रभावी दीर्घकालीन विकास होईल, अशी अपेक्षा शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र पाटील व शिवसैनिक व्यक्त केली.तसेच श्वेता ताई पाटील, पिंपळगाव हरेश्वर या सुद्धा या रस्त्यासाठी उपोषणाला बसल्या होत्या. पिंपळगाव येथे त्यांचे उपोषण माननीय सुमित दादा किशोर आप्पा पाटील गटनेते व नगरसेवक, पाचोरा यांनी २५/०३/२०२६ रोजी सोडवले. लवकरच हा प्रशासकीय गोंधळ दूर होईल व कायमस्वरूपी रस्ता तयार होईल, असे त्यांनी त्यावेळी सांगितले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button