रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान जिल्हा जळगाव तालुका पाचोरा : चेट्रिचंद्र (सिंधी समाजाचे ईष्टदेव भगवान झुलेलाल जी यांचा जन्मदिवस) व गुढीपाडवा (हिंदू नववर्ष) निमित्त पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी आपले योगदान द्यावे ही विनंती

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा : चेट्रिचंद्र (सिंधी समाजाचे ईष्टदेव भगवान झुलेलाल जी यांचा जन्मदिवस) व गुढीपाडवा (हिंदू नववर्ष) निमित्त पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांनी आपले योगदान द्यावे ही आग्रहाची विनंती सध्या विविध रक्तपेढ्यांमध्ये रक्ताची मोठ्या प्रमाणावर कमतरता भासत असून विशेषतः थॅलेसेमिया रुग्णांना नियमित रक्ताची गरज भासते. ही गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.हे रक्तदान शिबिर दि. २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत झूलेलाल मंदिर, सिंधी कॉलनी, पाचोरा येथे आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरासाठी रेड क्रॉस ब्लड बँक, जळगाव यांचे सहकार्य लाभणार आहे.या शिबिराचे नेतृत्व श्री. रवी सोनार व त्यांचा सहकारी गट करणार असून सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करून या सामाजिक कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन पुज्य सिंधी जनरल पंचायत, पाचोरा यांच्या वतीने करण्यात आले आहे.









