सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळ्यांचा परदाफाश एका वर्षातील वर्क ऑर्डर इस्टिमेट आणि बिलांची चौकशी करण्याची गरज अ:नगर (अहिल्यानगर) ते मालेगाव राज्य महामार्गावरील रस्त्यांना साईड पट्ट्या नसल्याने अपघातात मोठ्या प्रमाणावर वाढ वाहन चालकांचे जिव धोक्यात नाशिक जिल्हा विशेष प्रतिनिधी

प्रमुख राष्ट्रीय महामार्ग इंदोर – बेंगलोर तसेच येवला मनमाड मालेगाव राज्यमहामार्ग या सर्वच ठीक- ठिकाणी नादुरुस्त दुभाजक आणि रस्त्याच्या बाजूला साईट पट्ट्या पूर्णपणे रुंद केले नसल्याने अपघातात मोठया प्रमाणे वाढ झालेली आहे सा. बां. विभागात सर्व तालुका जिल्हास्तरावर मोठया प्रमाणे भ्रष्टाचार झालेला आहे या सर्व कामात अधिकारी व लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मनमानी भोंगळ कारभार सर्रास पणे राजरोज चालू आहे वरिष्ठ अधिकारी मुख्य सचिव मुख्य अभियंता यांचे यावर काहीही नियंत्रण राहीलेले नाही हे आज रोजी पूर्णपणे सिद्ध झालेले आहे तरी अहमदनगर मार्ग ते येवला मनमाड तसेच येवला पाटोदा लासलगाव व विंचूर लासलगाव ते चांदवड – मालेगाव येवला वैजापूर लासूरस्टेशन गंगापूर औरंगाबाद वाळूज पंढरपूर औरंगाबाद हा मुख्य राज्य महा मार्ग खड्ड्यात गेल्यामुळे अरुंद हायवे रस्ता खड्डेमय झाल्या मुळे दररोज सर्वत्र अपघातात वाढ होऊन सर्वच छोटे मोठे वाहनधारक चालकांना आणि दुचाकी धारकांना आपले जिव गमवावे लागत आहे तरी याकडे सक्षम अधिकारी लोकप्रतिनिधी हे कोणीच लक्ष देत नाही सा. बां. विभागाच्या दुर्लक्ष मुळे अशा मोठया या सर्वच ठिकाणी नागरिकांना अडी – अडचणींना सामोरे जावे लागत आहे, तरी राज्य सरकार शासन प्रशासनाने तात्काळ लक्ष केंद्रित करून वरिष्ठ पातळीवर त्रीय सदस्य समिती गठीत करून या सर्व बाबींचा अहवाल तपासण्याची जबाबदारी घ्यावी अशी मागणी सर्व परिसरातील नागरिकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे सदर निवेदन राज्याचे उपमुख्यमंत्री ना. एकनाथराव शिंदे ना. अजितदादा पवार यांच्याकडे राष्ट्रीय अल्पसंख्यांक हक्क विकास मंडळ महाराष्ट्र मुस्लिम महासंघ स्वाभिमानी सेना अन्याय भ्रष्टाचार निवारण जनहित समिती राष्ट्रीय आर. टी. आय. कृती समिती महाराष्ट्र राज्य लोकशाही मराठी पत्रकार संघ कौमे – खिदमत सोशल फाउंडेशन,यांच्या वतीने केली आहे सदर निवेदनावर महा. प्रदेशकार्याध्यक्ष तथा नाशिक जिल्हाध्यक्ष जनसेवक डॉ. शेरूभाई सादिकभाई मोमीन अजहर अली शाह मुनीर अन्सारी अरबाज मोमीन समीरभाई सैय्यद वसीम अन्सारी मुसा खान अनिसबाबा कुरेशी असलम शेख मुबारक शाह हुसेन हाजी बाबा कुरेशी राशीद शेख अकील शेख आरिफ सौदागर अ. वाहिद अन्सारी आश्रफ मोमीन सिद्धीक अन्सारी अल्ताफ पठाण अ. हमीदबाबा अन्सारी मोबीन मुलतानी सलीम मुलतानी छोटू अन्सारी ईब्राहिम सैय्यद जहीर अन्सारी भुरेखां जम्मेखां मुलतानी मौलाना अफजल खान दस्तगीर सैय्यद आदीसह सदस्य पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक यांच्या स्वाक्षऱ्या आहेत..








