ताज्या बातम्या

ब्रेकिंग न्यूज राहुल पांडे राज्याचे नवे मुख्य आयुक्त गजानन निमदेव रवींद्र ठाकरे प्रकाश इंदलकर विभागीय आयुक्त मुंबई महाराष्ट्र राज्याच्या मुख्य आयुक्तपदी पुढील तीन वर्षाचा कार्यकाळ असणार आहे तर राहुल पांडे नागपूर विभागाचे अनेक वर्षापासून पत्रकार तर माहिती आयुक्त म्हणून प्रभावी कार्यकाळ महाराष्ट्र सरकारने माहिती अधिकार क्षेत्रातील माहिती आयोगाची कार्यक्षमता वाढेल या दृष्टिकोनातून या चार जणांच्या नियुक्त्या केल्या आहे


महाराष्ट्र राज्य मुख्य माहिती आयुक्त पदी राहुल पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे तर विभागीय माहिती आयुक्त पदी गजानन निमदेव रवींद्र ठाकरे आणि प्रकाश इंदलकर यांची नेमणूक करण्यात आली आहे राहुल पांडे नागपूरचे पत्रकार असून त्यांनी अनेक वर्ष पत्रकारितेमध्ये काम केले यापूर्वी ते नागपूर विभागाचे माहिती आयुक्त म्हणून काम पाहत होते माहितीच्या अधिकाराच्या प्रभावी अंमलबजावणी त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे लिखाण अत्यंत स्पष्टपणे व प्रशासनातील पारदर्शकतेसाठी असलेली भूमिका नव्या पदावर महत्त्वपूर्ण ठरणार आहे तर गजानन निमदेव हे देखील नागपूर येथील पत्रकारिता क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती आहेत त्यांनी सामाजिक विषयावर दीर्घकाळ काम केले आहे रवींद्र ठाकरे हे माजी आयएएस अधिकारी असून त्यांना प्रशासनातील दीर्घ अनुभव आहे त्यांनी जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त अशा पदांवर काम करत नागरिकाभिमुख प्रशासनावर भर दिला आहे प्रकाश इंदलकर हे माजी प्रशासकीय अधिकारी असून त्यांच्या अनुभवाचा फायदा माहिती अधिकाराच्या अंमलबजावणीसाठी होणार आहे त्यांनी ग्रामीण व शहरी भागातील विकास क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामे केले आहे या चौघांचा पुढील कार्यकाल तीन वर्षाचा असणार आहे नागरिकांना वेळेत माहिती मिळावी प्रशासनातील पारदर्शकता यांच्यामुळे नक्की वाढेल याच दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकारने यांच्या नियुक्ती केल्या आहे यांच्या नियुक्तीमुळे माहिती अधिकार क्षेत्रातील माहिती आयोगाची कार्यक्षमता वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button