नालेसफाईची प्रत्यक्ष पाहणी; जळगाव महानगरपालिका महापौर दीपमाला काळे यांनी नागरिकांशी संपर्क साधला आणि संवाद शहरात विविध ठिकाणी भेटी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्रत्यक्ष जागेवर स्वतः भेट व पाहणी करून जळगावच्या पहिल्या महापौर_ दीपमाला काळे

जळगाव : पावसाळा तोंडावर आलेला असताना शहरातील नालेसफाई आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांची जळगाव शहर महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे यांनी शनिवारी चांगलीच कानउघडणी केली. शनिवार (दि. 20) रोजी सकाळीच महापौरांनी शहरातील विविध भागांत प्रत्यक्ष जागेवर जाऊन नालेसफाईची पाहणी केली व नागरिकांच्या तक्रारी जाणून घेतल्या. यावेळी टाऊन प्लॅनिंगच्या अधिकाऱ्यांना त्यांनी सोमवारी तातडीने अहवाल सादर करण्याचे आदेश दिले संभाजीनगर व रविराज कॉलनीतील नाल्यांवर अतिक्रमणे दौऱ्याच्या सुरुवातीला महापौर दीपमाला काळे यांनी संभाजीनगर चौक, विवेक कॉलनी आणि रविराज कॉलनी परिसराची पाहणी केली. येथे वायरिंगचे जाळे आणि नाल्यांची स्थिती अत्यंत बिकट असल्याचे दिसून आले. काही नाल्यांवर थेट घरे बांधली गेल्याचे समोर आले. पावसाळ्यात पाणी वाढल्यास येथे गंभीर समस्या निर्माण होऊ शकते अशी माहिती मुख्य स्वच्छता निरीक्षक रमेश कांबळे यांनी महापौरांना दिली. महापौरांनी स्वतः नाल्यांजवळ जाऊन स्थानिक नागरिकांशी संवाद साधला व त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या नागरिकांच्या तक्रारी; कामांचा घेतला आढावा यानंतर महापौरांनी रामानंदनगर परिसरातील विवेकानंद नगर आणि शिवनेरी सांस्कृतिक मंडळ परिसराची पाहणी केली. स्थानिक नागरिक प्रशांत पाटील व नागरिकांनी तक्रार केली की, “पावसाचे पाणी नाल्यातून थेट घरांमध्ये, अंगणात आणि कंपाऊंडमध्ये शिरते, ज्यामुळे मोठी घाण पसरते.” या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सोमवारपर्यंत माहिती सादर करण्याचे कडक निर्देश टाऊन प्लॅनिंग विभागाला दिले.महापौर यांच्या तत्परतेमुळे भारावून जाऊन रामानंदनगर मधील नागरिकांनी त्यांचे ‘केवळ आश्वासन देणारे नव्हे, तर प्रत्यक्ष जागेवर येऊन काम करणाऱ्या पहिल्याच महापौर दीपमाला काळे या शब्दात आभार मानले. यानंतर रामानंदनगर घाटातील शेवटी असलेल्या नाल्यात सुरू असलेल्या नालेसफाईचे काम पाहून महापौरांनी सफाई कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. तसेच लवकरात लवकर कामे पूर्ण करा असे सांगितले.पिंप्राळ्यात दुर्घटनाग्रस्त नाल्याची पाहणी प्रभाग क्रमांक 11 मधील खंडेराव नगर येथील रेल्वे पुलाजवळील नाल्याचीही महापौरांनी पाहणी केली. येथे पावसाळ्यात पाणी साचून आरोग्याचा प्रश्न निर्माण होतो. यावर तोडगा काढण्यासाठी सोमवारी अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावण्यात आली आहे. तसेच, प्रभाग क्रमांक १० मधील पिंप्राळा येथील वटुकेश्वर महादेव मंदिराजवळील नाल्याची पाहणी करण्यात आली. या नाल्यात भूतकाळात काही नागरिक व गुरेढोरे वाहून गेल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे येथील समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी नगररचना विभागाला विशेष निर्देश देण्यात आले. या पाहणी वेळी नगरसेवक सुरेश सोनवणे, अतुल बारी, सागर पाटील आणि महापालिका अधिकारी अतुल पाटील उपस्थित होते.पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापौरांचे कडक निर्देश शहरात कधीही मुसळधार पाऊस सुरू होण्याची शक्यता लक्षात घेता, महापौर दीपमाला काळे यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य विभागाला हायअलर्टवर राहण्याचे आदेश दिले आहेत. शनिवारच्या सुट्टीच्या दिवशीही महापौरांनी स्वतः मैदानात उतरून केलेल्या या पाहणी दौऱ्यामुळे जळगावकर नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

















