ताज्या बातम्या

पंढरपूर हायवेला अपघाताची मालिका सुरू 9 जणांचा जागेवरच मृत्यू तर 7 जणांना वाचवण्यात पोलिसांना यश मिळाले गणपती सिद्धनाथच दर्शन करून घरी येत असताना पिकअप गाडी तांदुळवाडी हायवे लगतच्या विहिरीत गेल्यामुळे मोठा अपघात झाला


पंढरपूरच्या जवळ राजनी गावाजवळून हायवे लगत भीषण अपघात पिकअप गाडी पंढरपूरच्या म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडी गावालगत पिकप गाडी विहिरीत पडून मोठा अपघात या अपघातात 8 ते 9 जण मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे पंढरपूर तालुक्यातील राजनी गावातील हे सगळे लोक आहेत म्हसवड येथील सिद्धनाथाच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या पिकप गाडीला काळाने आघात केला हा अपघात मोठा भीषण झाला सिद्धनाथ च्या दर्शनासाठी गेलेले भाविक घरी येत असताना माळशिरस तालुक्यातील तांदळवाडी गावाजवळ एका विहिरीत पिकप गाडी पडल्याने मोठा अपघात झाला पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 9 जणांचा जागेवरच मृत्यू झाला तर तांदूळवाडी अपघातात 7 जणांना वाचवण्यात यश मिळाले आहे जेसीबी व इतर यंत्रणाच्या सहाय्याने पोलिसांनी व नागरिकांनी 7 जणांना वाचवले आहे या रोडवर 2 विहिरी रस्त्या लगतच असून अत्यंत धोकादायक असून सुद्धा बाजूला कठडे नाही विहिरीला सुद्धा आजूबाजूंनी धोकादायक अशी पाटी लावलेली नाही या दोन विहिरी हायवे पासून 60 ते 70 फुट अंतरावर आहे अशी माहिती स्थानिक रहिवासी यांनी दिली अनेक वेळेस सांगूनही बांधकाम विभागाने या ठिकाणी धोकादायक नेमप्लेट लावलेली नाही व रस्ता रुंदीकरण केला नाही त्यामुळे हा मोठा एक्सीडेंट झालेला आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button