ताज्या बातम्या

जून ते जुलै दरम्यान पावसाला सुरुवात होते आणि त्याच कालावधी मध्ये साथीचे आजार होण्याची शक्यता असते या परिस्थितीत पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या अधिपत्याखाली संपूर्ण तालुका सरकारी व खाजगी आणि वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी प्रत्यक्षात असायला हवी होती परंतु ती यादी 2025/ 2026 या वर्षाची अपडेट यादी नाही पंचायत समिती पासून तालुका वैद्यकीय अधिकारी पर्यंत सगळा भोंगळ कारभार


पाचोरा तालुक्यातील तालुका वैद्यकीय अधिकारी यांचं जनतेच्या आरोग्या कडे पूर्णपणे दुर्लक्ष असल्याचे चित्र पाहायला मला सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले असून पाऊस पडल्यानंतर पावसाचे पाणी विहीर मध्ये जाऊन तोच दूषित पाण्याचा पाणीपुरवठा गावागावात होऊन जातीचे आजार होण्याची दाट शक्यता असते म्हणून पावसाळ्यापूर्वीच तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी खाजगी वैद्यकीय व्यावसायिक व सरकारी वैद्यकीय दवाखाने यांच्यावर लक्ष देऊन साथीच्या आजार रोखण्यासाठी पुरेपूर उपयोजना करणे गरजेचे असताना पाचोरा तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयात खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची यादी घेण्यासाठी पत्रकार निलेश पाटील गेले असता त्यांनी चालू वर्षाची खाजगी वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टरांची यादी नसल्याचं सांगितलं यावरून तालुका वैद्यकीय अधिकारी जनतेच्या आरोग्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याच दिसून येत आहे, याच वैद्यकीय तालुका अधिकारी याचे अध्यक्ष पंचायत समितीचे BDO असतात जबाबदारी घेणार तरी कोण? ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला असून साथीच्या आजारांमध्ये बोगस डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणात लोकांच्या जीवाशी खेळण्याचे प्रकार होण्याची शक्यता नाकारता येत नसून त्वरित तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी बोगस डॉक्टरची शोध मोहीम राबवून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होत आहे व जनतेच्या आरोग्याशी खेळणाऱ्या तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यावर सुद्धा वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कारवाई करावी ही सुद्धा मागणी जोर धरत आहे अनेक प्रकरणात


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button