ताज्या बातम्या

क्षणात होत्याचे नव्हते झाले बारामती जिल्हा पुणे निरा_ मोरगाव महामार्गावर दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू 9 वर्षीय भाऊ गंभीर ट्रकने दुचाकी मोटर सायकलला फरफटत नेले


दरम्यान पुणे बारामती चौधरवाडी फाटा परिसरात वारंवार अपघात होत असल्याने सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून तातडीने उपाययोजना झाली पाहिजे शनिवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन सख्ख्या बहिणींचा जागीच मृत्यू तर त्यांचा 9 वर्षीय भाऊ गंभीर जखमी झाला आहे या घटना मुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे मृत मुलींची नावे सेजल ज्ञानेश्वर बोडरे वय २० वर्ष अर्चना ज्ञानेश्वर बोंडरे वय वर्ष 25 तर ज्ञानेश्वर बोंद्रे हा 9 वर्षीय गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बारामती येथे रुग्णालयात उपचार सुरू आहे मिळालेल्या माहितीनुसार बोंडरे कुटुंबातील हे तिन्ही भावंडे मूर्ति येथे मामाकडे धोंडे जेवणासाठी जात होते त्यावेळी मोरगाहून निरेकडे भरगाव वेगाने जाणारा ट्रकने डीडी 1 जी 9343 चौधरवाडी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की दुचाकी काही अंतरावर फरपटत गेली या अपघातात दोन्ही बहिणी यांचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर ट्रक चालकाने घटनास्थळावरून वळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र सतर्क नागरिकांनी पाठलाग करून चालक मुकेश मेघवाल याला पकडून वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले घटनेची माहिती मिळतात सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी पाहणे केली पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button