ताज्या बातम्या

ठाणे येथे ३१ मे रोजी समता सैनिक दल शताब्दी महोत्सव अधिवेशन…आयु.किशोर डोंगरेमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या आणि त्यांचा तीस वर्षांचा सहवास लाभलेल्या समता सैनिक दलाचा शताब्दी समारोह विविध उपक्रमांनी दि. 31 मे 2026 रोजी ठाणे येथील राम गणेश गडकरी रंगायतन येथे सकाळी 9 ते सायं. 6 दरम्यान समता सैनिक दल, महाराष्ट्र राज्य यांनी आयोजित केला आहे


मा. राज्याध्यक्ष धर्माभूषण बागुल यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशनाचे उदघाट्न ठाणे महानगर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त मा. संदीप माळवीसाहेब यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमास मुख्य अतिथी म्हणून दै. वृत्तरत्न सम्राटचे कार्यकारी संपादक मा. कुणाल कांबळे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमास समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष कॅप्टन अशोक खनाडे, दिल्लीचे टेकसिंह गौतम, प्रा. डॉ. गुलाबराव राजे, धम्मा कांबळे, रमेश जाधव, ऍड. अभय लोखंडे, अशोक टेम्भरे, शाम मनोहर दासरी, कोअर कमिटी, राष्ट्रीय तसेच राज्य कार्यकारिणी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनाची सुरुवात सकाळी ९ वाजता दलाचे मुख्य ट्रेनिंग ऑफिसर मार्शल संतोष मोहिते यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सैनिक पथकाच्या सलामीने होईल. विविध मान्यवरांच्या अध्यक्षतेखाली समता सैनिक दल शताब्दी एक प्रवास, समता सैनिक दल वाढविण्यासाठी इंनोव्हेटिव्ह आयडिया, भारत राष्ट्र निर्माण ही प्रबोधन सत्रे पार पडतील यात विविध विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन करतील. क्रांतिगीते, पथनाट्य, जिल्हा कार्य अहवाल, मुक्त संवाद अशा विविध सत्रात बौद्धीक रेलचेल असेल. यावेळी समता सैनिक दलाचे तामिळनाडूचे डॉ. वेलूसामी, गुजरातचे भानुभाई चौहान, तेलंगणाचे रवींद्र बौद्ध, कर्नाटकाचे वेंकटरमणप्पा, दिलशाद तहसीलदार मध्यप्रदेशचे महेश चौबे, आंध्रचे फनिंद्रकुमार हरियाणाचे यशवंत चव्हाण, पश्चिम बंगालचे जितेंद्र प्रसाद, महाराष्ट्राचे संजय ओरके इत्यादी मान्यवर मार्गदर्शन करतील. या अधिवेशनात बहुजनांच्या शिक्षण, सामाजिक न्याय, भारत राष्ट्र निर्माण, संविधान इ. महत्वाच्या विषयावर अनेक ठराव पारित केले जातील सदर कार्यक्रमाला देशभरातून एक हजार मान्यवरांना निमंत्रित केले असून नागरिकांनी मोठ्या संख्येने या ऐतिहासिक आयोजनात सहभागी व्हावे, असे आवाहन समता सैनिक दलाचे महासचिव शशिकांत थूल व राज्यकार्यकारिणीने केले आहे.आज रोजी पत्रकार परिषदेत समता सैनिक दलाचे जळगांव जिल्हाध्यक्ष मार्शल किशोर डोंगरे यांनी दिली आसुन जास्तीत जास्त संख्खने उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button