ताज्या बातम्या

ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत 7.978 किलो गांजा जप्त; एकाला अटक भुसावळ रेल्वे स्थानकावर आरपीएफ ची कारवाई; श्वान पथकातील ‘वीरू’ने दिले अमली पदार्थांचे संकेत त्यानंतर भुसावल मार्गे येणारा विमल गुटखा यावरही नियंत्रण ठेवले जाईल विमल गुटखा बंद असून प्रत्येकाच्या खिशात पान टपरी येतो कसा काय ? नार्कोटेसमुळे दर महिन्याला हप्ते घेणारे यांची सुद्धा नार्कोटेस झाली पाहिजे त्याशिवाय भ्रष्टाचाराला आळा बसणार नाही?


प्रतीनीधी (गोपी अण्णा) भुसावल दि 30 रेल्वेगाड्या व रेल्वे परिसरातून होणाऱ्या अमली पदार्थांच्या अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेच्या भुसावल विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या ‘ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत रेल्वे सुरक्षा बलाने (आरपीएफ) मोठी कारवाई केली. उधना-अमृत भारत एक्स्प्रेसच्या अनारक्षित डब्यातून गांजाची तस्करी करणाऱ्या एका संशयिताला ताब्यात घेत त्याच्याकडून 7.978 किलो गांजा, अंदाजे 3 लाख 98 हजार ९०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.दि. 30 जुलै रोजी गाडी क्रमांक 19022 अप उधना-अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये सीआयबी, भुसावळचे उपनिरीक्षक सुनील कोळी हे नियमित गस्त घालत असताना एका प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद आढळल्या. चौकशी व तपासणीदरम्यान बाबू विजय गौडा (वय 23, रा. धमनखौला, डिगापडा कोडला, जि. गंजाम, ओडिशा) हा रेल्वेच्या शौचालयात अमली पदार्थ लपवून त्याची वाहतूक करत असल्याचे समोर आले.गाडी भुसावळ स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर पोहोचल्यानंतर सहाय्यक उपनिरीक्षक ओ. पी. मीणा व आरपीएफच्या पथकाने तत्काळ कारवाई करत संशयिताला त्याच्या बॅगेसह ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला सीसीटीव्हीच्या निगराणी खाली ठेवण्यात आले. घटनेची माहिती वरिष्ठ अधिकारी तसेच विभागीय सुरक्षा नियंत्रण कक्षाला देण्यात आली दरम्यान, आरपीएफच्या श्वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. ड्युटीवरील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेची तपासणी करताना अमली पदार्थ असल्याचे संकेत दिले. आवश्यक कायदेशीर प्रक्रिया व सक्षम अधिकाऱ्यांची परवानगी घेतल्यानंतर राजपत्रित अधिकारी अभय कुमार शर्मा, सहाय्यक वाणिज्य व्यवस्थापक (गुड्स), भुसावळ यांच्या उपस्थितीत बॅगेची झडती घेण्यात आली. यावेळी बॅगेतून गांजाची चार पाकिटे आढळून आली.जप्त केलेल्या गांजाचे एकूण वजन 7.978 किलो असून त्याची अंदाजे बाजारातील किंमत ३ लाख 98 हजार 900 रुपये आहे. पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपीसह जप्त केलेला गांजा शासकीय रेल्वे पोलिस (जीआरपी) भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आला.जप्त मुद्देमाल गांजा : 7.978 किलोअंदाजे किंमत : ₹3,98,900
गांजाची पाकिटे : 4 कारवाई : ‘ऑपरेशन नार्कोस’अंतर्गत‘वीरू’ची महत्त्वाची भूमिका आरपीएफच्या श्वान पथकातील ‘वीरू’ या श्वानाने संशयिताच्या बॅगेत अमली पदार्थ असल्याचे संकेत दिल्यानंतर बॅगेची तपासणी करण्यात आली. त्यातून गांजाची चार पाकिटे जप्त करण्यात आली.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button