ताज्या बातम्या

“”जिल्हा जळगाव ता; भडगांव तहसील व पोलिस स्टेशन अंतर्गत बाहेरच्या आवारात कंम्पाउट करण्याची मागणी “”तहसील व पोलीस स्टेशनच्या कामकाजासाठी सामान्य नागरिकांना रोजच अडीअडचणी येतात सामाजिक कार्यकर्ता विजय दोधा पाटील भडगाव


भडगाव :– येथील तहसील व पोलिस स्टेशन कार्यालयाच्या आवारात खाजगी वाहन धारक हे वाहणे लावून संपूर्ण वापर रस्ता हा रहदारी बंद होऊन दररोज दाट अडचणीतून तहसील व पोलिस स्टेशन कार्यालयात जावे लागते तहसिलदार व पोलिस अधिकारी व ईतर अधिकारी यांना बाहेर निघताना अवैध अतिक्रमणीत वाहने दररोज बाजूला करून आत/ बाहेर प्रवेश करावा लागतो.. कामकाजाच्या निमीत्ताने येणारे सामान्य नागरिकापेक्षा येथील आवारात मुद्रांक दलाल / एजट‌ तोतयेची संख्या दुपटीने वाढली आहे. तसेच दुसरी कडे.””लाखो रुपये महसूलची लुट करणारा.. बिल्डर दलालाचे मोठे रॅकेट कार्यरत आहे””दिवसाला लाखो रुपये भ्रष्टाचार बोगस दस्त नोंदणी करुन सरकारला चुना लावत आहे दुय्यम नि.रजि श्री.महेश कुलकर्णीच्या माध्यमातून बोगस दस्त नोंदणी करुन डल्ला मारतआहेत.”या प्रकरणी काही लुटारु मुद्रांक विक्रेता तहसील आवारात बसण्याची परवानगी तहसिलदार यांनी देऊ नये.. त्याची तहसील आवारातील अतिक्रमणे काढून बाहेर बसण्याची परवानगी द्यावी.. या लुटारू ना फक्त मुद्रांक विक्रीचा परवाना दिला आहे.. त्याना खरेदी विक्री कार्यालयात पक्षकराबरोबर आत जाऊ देऊ नये.. . अशी मागणी विजय पाटील यांनी तहसीलदार यांचे कडे तक्रार केली आहे..व लुटारू मुद्रांक विक्रेताचे बाहेरचे अतिक्रमणे काढून आवाराच्या बाहेर कंपाउंड करून अवैध वाहनांचा बंदोबस्त व लुटारू मुद्रांक विक्रेत्यांना बाहेर काढण्याची मागणी तसेच इतर नवीन सुशिक्षित बेरोजगार मुलांना जुने मुद्रांक विक्रेते यांनी बऱ्याच ठिकाणी जागा अडकवून ठेवलेल्या आहेत एकच नावाने व त्यांच्या नातेवाईकांच्या नावाने काही मुद्रांक विक्रेते सरकारी जागेवर अतिक्रमण करून बसले आहेत काही दुकाने तर बंद असतात अशा जागेवरचे अतिक्रमण काढण्यात यावे व सुशिक्षित बेरोजगार युवकांना स्टॅम्प विक्री व ऑनलाइन परवानगी द्यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय दोधा पाटील यांनी केली आहे तसेच आवाराच्या बाहेर नवीन कंपाउंड करण्याची मागणीही केली आहे’


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button