ताज्या बातम्या

महाराष्ट्र राज्य बीड जिल्ह्यातील आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी काही अधिकारी व एजंटांचे केले स्टिंग ऑपरेशन 15 वर्षापूर्वीच्या जुन्या वाहनांच्या कोणत्याही तपासण्या न करता फिटनेस सर्टिफिकेट मिळवून देत आहे बीड मधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गणेश विघ्ने यांना गुप्त माहिती मिळाली त्यांनी एजंट अधिकाऱ्यांचा स्टिंग ऑपरेशन द्वारे केला पर्दाफाश


15 वर्षांपूर्वीचे जुनी वाहने पासिंग करणाऱ्या एजंटांचा व अधिकाऱ्यांचा आरटीओ गणेश विघ्ने यांनी केला पर्दाफाश जुन्या वाहनांच्या कोणत्याही तपासण्या न करता फिटनेस सर्टिफिकेट मिळवून देत आहे अशी गुप्त माहिती बीड मधील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील गणेश विघ्ने यांना मिळाली आणि त्यांनी कोणताही वेळ न गमवता स्टिंग ऑपरेशन द्वारे पर्दाफाश केला तर बीड पोलीस स्टेशनला अनेक वेळेस गुन्हे दाखल केला आहे स्वतःला आरटीओ समजणारे एजंट व्हिडिओ कॉन्फरन्स वर बोलताना सांगत होता की मी स्वतः आरटीओ अधिकारी आहे याचा अर्थ असा होतो की काही आरटीओ अधिकाऱ्यांनी एजंटला संपूर्ण अधिकार देऊन टाकलेला आहे आरटीओ अधिकाऱ्यांचे एजंट यांनी आतापर्यंत मोठ मोठे कारनामे केले महाराष्ट्रातील एजंटांनी थेट एमपी राज्यामधील इंदोर येथे आरटीओ अधिकारी यांच्याशी थेट संपर्क साधला आणि विनापरवाना पासिंगच्या वाहनांचा पासिंग बद्दल विचारणा केली असता संबंधित एजंट ने गाडी पासिंग करून दिल्याचे कबूल केले गाडी पासिंग करून देतो त्याबद्दल 55 हजार रुपये घेतले त्यानुसार त्याला 55 हजार रुपये मिळाले 15 वर्षांपूर्वीची जुनाट गाडी फोर व्हीलर ट्रक ट्रॉला अशाप्रकारे नागपूर येथेही अशी वाहने पासिंग करण्यात आलेली आहे मागच्या न्यूज मध्ये ही बातमी टाकली होती गणेश विघ्ने यांच्या म्हणण्यानुसार मी स्वतः जी गाडी इंदोरच्या एजंट मार्फत पासिंग करून घेतली त्या गाडींची कोणत्याही प्रकारची पासिंग फिटनेस तपासण्यात आली नाही व तेथील संबंधित अधिकारी त्यावेळेस काय करत होते हा महत्वपूर्ण प्रश्न प्रत्येक ठिकाणी होत असून काही आरटीओ अधिकारी ऑफिसला फक्त 8 दिवसातून एकदाच ऑफिसमध्ये येता बाकी सगळे कार्य एजंट किंवा दलाल पंटर पाहून घेतात यामुळे दर महिन्याला दीड लाख रुपये पगार असणाऱ्या अधिकाऱ्यांनी आपले काम सत्य करावे ते का करत नाही घोटाळे का करत असतात याशिवाय मध्य प्रदेशातील आरटीओ अधिकारी कोणतेही वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट वाहन न पाहता देऊन टाकतात त्यातूनच लाखो करोडो रुपये काळी कमाई करतात हरियाणा पंजाब उत्तर प्रदेश मध्य प्रदेश गुजरात या राज्यातील एजंट महाराष्ट्रात फिरत असतात आणि तपास करून ट्रान्सपोर्ट चालक-मालक यांच्या गाड्या बंद अवस्थेत असणाऱ्या वाहनांच्या मालकांना विचारणा करून सगळी गुप्त माहिती सांगत असतात ज्या जुनाट वाहने रस्त्यावर धावण्याच्या परिस्थितीत नसतात त्यांची पासिंग हे एजंट अधिकारी दलाल करतात आणि अशी खराब वाहने रस्त्यावर चालल्यामुळे एक्सीडेंट होऊन अनेक जणांचा नाहक बळी जातो याबाबतीत आरटीओ अधिकारी यांना विचारणा केल्या असता ते काहीही उत्तर देत नाही अशा परराज्यातील एजंटांना आळा घालण्यासाठी स्टिंग ऑपरेशन मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे असा इशारा आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी दिलेला आहे अन्यथा जुन्या वाहनांची पासिंग एजंटामार्फत झाली तर यापुढे चालक-मालक यांच्यावर क** करण्यात येईल व संबंधित अधिकारी यांना जबाबदार धरले जाईल असा इशारा आरटीओ अधिकारी गणेश विघ्ने यांनी दिला आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button