शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरलेला भाजपाचा अजेंडा बनावट रासायनिक खते बियाणे बाजारात गुजरात मधूनच षडयंत्रकारी ईव्हीएम मशीन सुद्धा गुजरात मधून

रासायनिक खते बियाणे भरलेले ट्रक संभाजीनगर जिल्ह्यात वैजापूर तालुक्यात थीऊर येथील मार्केटमध्ये विक्रीला विक्रेत्यावर गुन्हा या अगोदर सुद्धा किती बोगस खते बियाणे आले बोगस विक्रेत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकरी करीत आहे शेतकऱ्यांची आत्महत्या कशामुळे होते बियाणे खते औषधी डुबलीकेट येतात उत्पन्न घटत असून त्यातच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही नैराश्य आणि सगळीकडून ग्रासलेला शेतकरी आत्महत्या करीत आहे सुरुवातीला काँग्रेस आणि आता भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी कर्दनकाळ ठरत असून शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत लोटून अदानी अंबानी ला जमीन कशी मिळेल या प्रवृत्तीचे सरकार अगदी घाणेरडे विचाराचे सरकार शाबासकीचा हात शेतकऱ्यांच्या डोक्यावरून फिरवत आहे अनेक ठिकाणी रासायनिक खते बियाणे डुबलीकेट येत असून मुख्य विक्रेत्यांवर क** कारवाई का नाही अनेक कंपन्यांचे डुबलीकेट पॅकेज बनवून विक्रीला आणले जात आहेत काही सतर्क शेतकऱ्यांनी कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून कृषी अधिकाऱ्यांना माहिती दिली त्या गोडाऊन याप्रकरणी महादेव ऍग्रो सर्विसेस चे आकाश सोमनाथ जगताप राहणार पाराळा जिल्हा वैजापूर या विक्रेत्याविरोधात थीउर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे बोगस बियाणे खते गुजरातहूनच का येतात हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांना पडलेला आहे प्रत्येक गावात शेतकऱ्यांनी भाजपाच्या खासदार आमदारांना गावात घुसू देत नव्हते तरी कस काय निवडून आले, आले तर आले बोगस खते बियाणे महाराष्ट्रात कस काय आणतात अशी चर्चा शेतकरी करीत आहे काही शेतकरी शिकलेले नसतात त्यांना अतिशय योग्य सल्ला देऊन डुबलीकेट खते बियाणे विक्रेते देत असतात त्यांच्या भावनांशी त्यांच्या कुटुंबाची खेळ करून त्यांना संपवण्याचा आणि पैसे कमवायचा मार्ग काही व्यापारी वर्ग सुकर करीत आहे हा प्रकार काही हुशार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने शेतकरी वर्गामध्ये संतापाची लाट तयार झाली आता रब्बी हंगाम जोरात असून शेतकरी शेती मशागतीसाठी व्यस्त असल्याने शेतकऱ्यांना कसे लुबाडायचे त्यातच निवडणुकांमध्ये कृषी अधिकारी यांना सरकारने काम लावल्याने अधिकारी निवडणुकीत व्यस्त असल्यामुळे याचा फायदा व्यापारी घेत आहे बनावट खते बियाणे विक्रीची माहिती मिळतात कृषी अधिकारी प्रकाश देशमुख कृषी आयुक्त रवींद्र निविष्ठा गुण नियंत्रण संचालक सुनील बोरकर मुख्य गुण नियंत्रक सुनील बोरकर मुख्य गुणनियंत्रक प्रवीण देशमुख विभागीय कृषी महासंचालक डॉक्टर तुकाराम मोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सदरील ठिकाणी छापा टाकला असता सदर खत गोदाम विक्रेत्याची गोदामाची चौकशी करून गोदामाला सील लावण्यात आले बनावट बियाणे खते कुठून आले याची असून चौकशी करण्यात आली विक्रेत्याकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यामुळे पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती कृषी अधिकारी प्रकाश देशमुख यांनी दिली दरम्यान बाजारात दिसणारे हुबेहुब नक्कली दिसणारे खते बियाणे कमी किमतीत विक्री करताना आढळले अशा घटना वारंवार घडत आहेत मग सरकार काय करीत आहे त्यांचे नियंत्रण नाही का असा सवाल शेतकरी वर्ग करीत आहे यापुढे शेतकऱ्यांनी बियाणे खते औषधी घेताना शहानिशा करूनच शेतीसाठी लागणारे खते बियाणे विकत घ्यावी

