जळगाव जिल्ह्यात ऑपरेशन वॉश आऊट महसूल विभागाने अवैध रेती उपसा रोखण्यासाठी दबंग कार्यवाही करण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ: महेश्वर रेड्डी यांच्या मदतीने संपूर्ण दबंग पोलीस स्टॉप यांना पाचारण करून रेतीची अवैध वाहतूक रोखण्यासाठी अवैध वाहनांवर धडक कार्यवाही

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ: महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर व संपूर्ण तालुक्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यातील वाळू माफियांच्या मुसक्या आवरल्या आहेत एरंडोल येथे 40 ब्रास अनधिकृत वाळू जप्त केली आहे चार दिवसापूर्वी जळगाव येथील वाळूच्या डंपर ने बालकाला चिरडले या अगोदर सुद्धा ट्रॅक्टर असेच डंपर असो किंवा ट्रॅक्टर अनेकजण आपल्या जीवाशी गेले प्रकरण जास्तच वाढत गेले वाळू वाहतूक करणाऱ्यांची दबंगिरी वाढली त्यामुळे शेवटी निर्णय पोलीस डॉ: अधीक्षक रेड्डी यांना निर्णय घ्यावा लागला दिनांक 28 डिसेंबर पासून कार्यवाही ला सुरुवात झाली अनेक तालुक्याच्या ठिकठिकाणी वाळूचे डंपर ट्रॅक्टर वाळूचे साठे यांच्यावर कार्यवाही करण्यात आली बिगर नंबर प्लेटच्या वाहनांवर सुद्धा कार्यवाही करण्यात आली पाचोरा तालुक्यातील 8 ट्रॅक्टर एक डंपर 24 दुचाकी मोटर वाहन कायद्याअंतर्गत कार्यवाही करण्यात आली सदरची कार्यवाही वाहतूक पोलीस एएसआय गुलाब मनोरे गोपाल जाधव पोलीस कॉन्स्टेबल संजय पाटील पोलीस कॉन्स्टेबल भोजराज धनगर पोलीस कॉन्स्टेबल जितेश पाटील हवालदार अशोक हटकर या पथकाने कार्यवाही केली सदरची कार्यवाही यापुढे सुरू राहणारच मोटर वाहन कायद्यानुसार नंबर प्लेट लावून वाहनांचे कागदपत्र झेरॉक्स कॉपी सोबतच ठेवावी वाहतूक नियमाचे काटेकोरपणे पालन करावे डॉ: रेड्डी यांनी असे आव्हान प्रत्येक तालुक्यातील पोलीस स्टेशनला दिले त्यानंतर लगेच तत्पर पाचोरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक अशोक पवार यांनी दोन दिवसात दबंग कार्यवाही केली मोटरसायकली चोर यांच्यावर ही दबंग कारवाई झाल्यानंतर आता पोलीस अधीक्षक जळगाव डॉ: महेश्वर रेडी सट्टा पत्ता ऑनलाईन गेम बंद करणार का ही उत्सुकता जनतेला लागलेली आहे पोलीस अधीक्षक यांनी प्रत्येक तालुक्यातील पोलीस निरीक्षक यांना आदेश द्यावे अशी जनतेची मागणी आहे त्यामुळे अनेकांचे संसार उध्वस्त झाले ते पुढे भविष्यात होऊ नये अशी कार्यवाही झाली पाहिजे अनेक सट्टा मट्टा खेळणाऱ्यांनी आत्महत्या केल्या मागील 25 वर्षांपूर्वी जळगाव जिल्ह्याला लाभलेले दबंग पोलीस अधीक्षकांपैकी एक महत्त्वपूर्ण अधीक्षक डॉ: भूषण कुमार उपाध्याय यांनी सट्टा पत्ता ऑपरेशन वॉश आऊट मोहीम मिशन राबवले होते आणि ते सक्सेसफुल करून दाखवले ते जोपर्यंत जळगाव जिल्ह्यात होते तोपर्यंत दोन नंबर धंदे यांना रात्रंदिवस भूषण कुमार समोर दसत होते संपूर्ण मुळासकट सट्टा पत्ता मालक यांची झोप उडवून टाकली होती जळगाव जिल्ह्यात सट्टा पत्ता दोन नंबर धंदेवाल्यांचे ऑपरेशन सक्सेसफुल करून दाखवले दबंग कारवाई भूषण कुमार उपाध्याय यांनी केली लक्झरी बसेस संपूर्ण इन्शुरन्स असलेल्याच गाड्या रस्त्यावर दिसायच्या इतकी पावर उपाध्याय यांची होती
