जिल्ह्यात भुसावल भडगाव नंतर आता जळगाव मध्ये पिस्तोल लोकशाही समाप्त जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त जनार्दन पवार यांनी कोंबडी बाजार येथे गाडी पार्किंग वरून रिक्षावाल्याच्या कानशिलात लगावली आणि पिस्तोल काढला_एस पी सो: जळगाव श्रीकांत धीवरे काय भूमिका घेतील जनतेचे लक्ष

बदलण्याची भावना नेहमी हिंसेला जन्म देते हे आता काही नवीन राहिलेल नाही जळगाव जिल्ह्यात आता अनेक तालुक्यांमध्ये पिस्तोल बाहेर निघत आहे पिस्तोल येतात कुठून? चौकशी कधी करणार जळगाव जिल्ह्यातील पोलिसांचा धाक संपला का? जळगाव जिल्हा अधिकारी कार्यालयातील नगर विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त जनार्दन पवार यांनी किरकोळ कारणावरून युवकाला लगावली कानशिलात गाडी पार्किंग वरून वाद महाराष्ट्र शासन असे लिहिलेली गाडी क्रमांक MH 19 DV 9889 ही गाडी कोंबडी बाजार जळगाव येथे पार्क केली त्यानंतर रिक्षावाला याने सांगितले साहेब गाडी बाजूला करा मला गाडी काढायची आहे जनार्दन पवार हे हाफ चड्डीवर बाहेर येऊन त्या रिक्षाचालक युवकाला डायरेक्ट कानशिलात मारली आणि पिस्तोल काढली यामुळे वातावरण अचानक बदलले त्यानंतर तिथे जवळच असणारे अनेक जण आल्यानंतर सहाय्यक आयुक्त पवार यांनी पिस्तोल गाडीमध्ये ठेवला आणि म्हणाले मी एवढ्या लांब गाडी पार्क केली तरीही लोकांना अडचण होत आहे गाडी पार्क होती त्या गाडीत हे महाशय दारू पीत होते असे तेथील पाहणाऱ्यांनी सांगितले रिक्षा चालक युवकाने त्या महाशयांना सांगितले मी गाडी कशी काढणार थोडी गाडी बाजूला करा असे सांगायचा उशीरच आणि न होणारे ते होऊन बसले कारण शासनाचे असे मोठे अधिकारी पदाचा गैरवापर करतील तर सामान्यांचा विषय काय? आता पुढील कार्यवाही जळगाव एस पी सो श्रीकांत धीवरे काय भूमिका घेतील याकडे जनतेचे लक्ष लागले आहे












