जिल्हा जळगाव भुसावळात रेल्वे कर्मचाऱ्याचा निर्घृण खून ; चाकूचे सपासप वार पाटील मळ्यात रक्तरंजित थरार; 112 वर कॉल अन् अवघ्या काही वेळात अल्पवयीन संशयित पोलिसांच्या ताब्यात

भुसावळ प्रतिनिधी : Gopi anna
पोळा सणाचा उत्साह ओसरत असतानाच भुसावळ शहराला हादरवून सोडणारी रक्तरंजित घटना गुरुवारी रात्री घडली. शहरातील पाटीलमळा भागात भुसावळ रेल्वेत कार्यरत असलेल्या 35 वर्षीय तरुणाची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. तुषार गोविंद सोनवणे (वय 35, रा. समता नगर, भुसावळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नसले, तरी घटनेनंतर पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत एका अल्पवयीन संशयिताला ताब्यात घेतले आहे पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, तुषार सोनवणे हे गुरुवारी रात्री परिचिताची दुचाकी (एमएच 19 सीएच 1405) घेऊन पाटीलमळा परिसरातून जात होते. याचवेळी त्यांचा एका अल्पवयीन संशयिताशी कोणत्या तरी कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान काही क्षणांतच जीवघेण्या हल्ल्यात झाले. संशयिताने तुषार यांच्या डोक्याच्या मागील बाजूस आणि पाठीवर चाकूने सपासप वार केले. गंभीर जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन तुषार यांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले रक्ताच्या थारोळ्यात तरुण; परिसरात खळबळ गुरुवारी रात्री साडेआठ वाजेनंतर या घटनेची माहिती पोलिसांच्या 112 क्रमांकावर देण्यात आली. माहिती मिळताच बाजारपेठ पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात आली.दरम्यान, जळगाव गुन्हे शाखेचे पथक शहरातच असल्याने त्यांनीही तपासात सहभाग घेतला. हल्ल्यानंतर संशयित पायी पसार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या संभाव्य मार्गाचा माग काढला. मिळालेल्या माहितीनुसार, अल्पवयीन संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगण्यात आले.वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक केदार बारबोले, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली. हत्येच्या तपासासाठी फॉरेन्सिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे संकलित करण्याचे काम सुरू करण्यात आले.










