जिल्हा जळगाव तालुका पाचोऱ्याच्या शर्वरी कुलकर्णीची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत कांस्य_ पदकाला गवसणी!

पाचोरा (प्रतिनिधी) – खोपोली येथे झालेल्या 19 वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनगटात तृतीय क्रमांक; पाचोऱ्यातून अभिनंदनाचा वर्षाव पाचोरा महावीर व्यायामशाळा संचलित तारा राणी महिला क्रीडा संकुल, नगरपालिका टाऊन हॉल, पाचोरा येथील महिला कुस्तीपटू शर्वरी निलेश कुलकर्णी हिने खोपोली येथे आयोजित 19 वर्षांखालील शालेय राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत 65 किलो वजनगटात तृतीय क्रमांक पटकावत कांस्यपदक मिळविले. तिच्या या यशामुळे पाचोऱ्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.शर्वरीला तिचे गुरु तथा वस्ताद पैलवान दिनेश पाटील यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले. तसेच महावीर व्यायामशाळेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील, कैलास आम्ले सर, एस. के. पाटील सर, बटू पैलवान निलेश कुलकर्णी सर आणि ठोंबरे सर यांचेही मार्गदर्शन तिला मिळत आहे.याशिवाय माजी नगराध्यक्ष शरद भाऊ पाटे, नगरसेवक सुमित सावंत व शरद पाटील, अमित भाऊ पाटील तसेच पाचोरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी मंगेश देवरे सर यांच्या सहकार्याचा आणि मार्गदर्शनाचा शर्वरीच्या क्रीडा प्रवासात महत्त्वाचा वाटा आहे. प्रकाश भाऊ मिश्रा, किशोर भाऊ भोई, मयूर शेलार आणि एस. के. अण्णा पाटील यांचेही तिला प्रोत्साहन लाभत आहे.शर्वरीच्या या उल्लेखनीय यशाबद्दल पीटीसीचे चेअरमन संजय वाघ यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला.यावेळी पीटीसीचे सचिव व्ही. टी. जोशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.शर्वरीने मिळविलेल्या या यशामुळे महिला कुस्ती क्षेत्रात पाचोऱ्याचे नाव उज्ज्वल झाले असून, तिच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी सर्व स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत







