जिल्हा जळगाव पाचोरा तालुक्यातील ग्राम विकास विद्यालय पिंपळगाव (हरेश्वर) क्रीडा विभागाचे अभिमानास्पद यश! हार्दिक अभिनंदन!

🏆आज दी 01/10/2026 रोजी अमळनेर येथे झालेल्या शालेय जिल्हास्तरीय ज्यूदो स्पर्धा– 2026 मध्ये ग्राम विकास विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पिंपळगाव हरेश्वर येथील 5 मुली आणि 1 मुलगा हे खेळाडू विजयी झाले त्यात U14 गटा मध्ये नंदिनी बडगुजर, प्रिया बडगुजर आणि U17 च्या गटात जागृती बडगुजर, मोनाली पाटील व देवेश मालकर तसेच U19 च्या गटात वैष्णवी सपकाळ हे सर्व खेळाडू विजयी होऊन नाशिक येथे होणाऱ्या शालेय विभागीय ज्यूदो स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली त्यानी विद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.🥉🏆या उल्लेखनीय यशासाठी खेळाडूंना विद्यालयाचे क्रीडा शिक्षक सादिक शेख सर आणि श्रीमती सरला सोनवणे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल ग्राम विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. रवींद्र सुखदेव गीते (रवीभाऊ), चिटणीस श्री. यशवंत प्रभाकर पाटील (बाळूभाऊ), तसेच सर्व संचालक मंडळ यांनी खेळाडूंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.तसेच ग्राम विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. पी. जे. तेली सर, उपमुख्याध्यापक श्री. पी. ओ. चौधरी सर, श्री. पी. आर. देशमुख सर, पर्यवेक्षिका सौ मंगला साळुंखे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनीही या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले.











