ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज जि: जळगाव ता; भडगाव येथील कोळगाव ग्रामपंचायत उपसरपंचपदी शीतल महाजन बिनविरोध_ तर// संभाजीनगर येथील वाळुज एमआयडीसी मधून 24 तासात 7 जण बेपत्ता यात महिलांचा समावेश जास्त प्रमाणात चिंता वाढली


भडगाव : प्रतिनिधी विजय माळी
कोळगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. शीतल कपिल महाजन यांची बुधवार, दि. 23 सप्टेंबर रोजी बिनविरोध निवड झाली. उपसरपंच पदासाठी सौ. शीतल महाजन यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र लोणीया यांनी त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.यावेळी मावळत्या उपसरपंच सौ. ज्योती महाजन यांनी नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शीतल महाजन यांच्याकडे पदाचा पदभार सुपूर्द केला. याप्रसंगी सरपंच सौ. कविता सोनवणे, सौ. ज्योती महाजन, सौ. प्रमिला पाटील, सौ. सुनंदा माळी, सौ. वंदना शिवदास भिल्ल, सौ. सीमा संदेश महाजन, रूपचंद महाजन, रोहिदास पाटील, शुभम ठाकरे आदी ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. तसेच ग्रामपंचायत सदस्य विनायक पाटील व विजय केदार सर यांनी दूरध्वनीद्वारे अभिनंदन केले.नवनिर्वाचित उपसरपंच सौ. शीतल महाजन यांचे पती कपिल महाजन सर हे किसान शिक्षण संस्थेच्या वडजी येथील विद्यालयात शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल किसान शिक्षण संस्थेचे चेअरमन नानासाहेब प्रताप हरी पाटील तसेच संस्थेच्या सचिव ताईसौ. पूनमताई प्रशांत पाटील यांनी कपिल महाजन सर व सौ. शीतल महाजन यांचे अभिनंदन केले.यावेळी ग्रामपंचायत कोळगाव नम्रता पॅनलचे प्रमुख श्याम पाटील सर, पितांबर पवार, कौतिक सोनवणे, गोविंदराव अमराव महाजन, कपिल महाजन सर, रविंद्र बोरसे सर (बहाळ), डॉ. अनुप पाटील, प्रल्हाद रंगराव पाटील, संदीप हिम्मतराव महाजन, जिभाऊ मालजी पाटील (पिप्रिहाट), गोपाल नाना माळी, दिलीप पाटील सर, सुभाष मोतीराम पाटील, बापू सखाराम पाटील, शिवाजी सोनवणे, आत्माराम ठाकरे, प्रदीप महाजन, भरत पाटील, सुनील पाटील, सुभाष जयराम माळी, देवेंद्र राजेंद्र पाटील, बापू गोविंदा पाटील, एकनाथ अभिमान महाजन, आनंदा महाजन, प्रमोद महाजन, चिंधा फकीरा माळी, राजेंद्र जयराम पाटील, सावता रामदास महाजन, संदेश महाजन सर, गोविंदा तुकाराम माळी, योगेश सैदाणे, हेमंत महाजन, रामदास पाटील, रवींद्र दशरथ माळी, श्याम राजेंद्र माळी, योगेश साहेबराव महाजन, दिनेश पाटील, अंकुश कौतिक सोनवणे, शिवशंकर महाजन, पांडुरंग माळी, अनिल बिऱ्हाडे, भिमराव महाजन, प्रविण महाजन, हेमंत घोडके, गुलाबराव महाजन, संजय जाधव, साहेबराव कोळी, योगेश महाजन, समाधान माळी, रोहित माळी, जितू गोसावी, बापू पवार व दिनेश माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.उपसरपंचपदी सौ. शीतल महाजन यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.////_ _
संभाजीनगर येथील (औरंगाबाद) येथील वाळूज एमआयडीसी परिसरात 24 तासात 7 जण बेपत्ता त्यात महिलांचा समावेश जास्त असल्याने कुटुंबीयांची चिंता वाढली वाळुज एमआयडीसी परिसरात गेल्या काही दिवसापासून बेपत्ता होणाऱ्या व्यक्तींच्या घटना समोर येत आहे अवघ्या 24 तासात 7 जण बेपत्ता त्यात महिलांची संख्या अधिक असल्याने या घटनेकडे गांभीर्याने पोलिसांनी लक्ष द्यावे अशी बेपत्ता झालेल्या कुटुंबीयांकडून मागणी होत आहे यातून काही महिला कामासाठी बाहेर पडल्यानंतर त्या पुन्हा घरी आल्याचं नाही त्यामुळे कुटुंबीयांनी नातेवाईकांनी मित्रांनी आणि परिसरातील स्नेही यांनी शोध घेतला मात्र काहींचा ठिकाणा अजून पर्यंत लागला नाही महिला बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे धाव घेतली असून तक्रारी दाखल केल्या आहे या प्रकरणात महिलांना कोणीतरी लालूच देऊन पळवून घेऊन गेल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे तक्रार मिळाल्यानंतर एमआयडीसी पोलीस स्टेशन यांनी आपले चक्र सुरू केले आणि बेपत्ता झालेल्या त्यांच्या नातेवाईकडून फोन नंबर मोबाईलचा वापर ते कुठे कामाला जात होते नातेवाईक मित्रपरिवार शेवटचे ठिकाण यांची संपूर्ण माहिती घेतली त्याचप्रमाणे रेल्वे स्टेशन बस स्थानक लक्झरी स्टॉप इतर महत्त्वपूर्ण ठिकाणी कसून चौकशी केली गेली एकाच परिसरातून कमी कालावधीत अनेक जण बेपत्ता झाल्याने नागरिकांमध्ये चर्चा सुरू झाली नेमकं होतं काय विशेषता महिला व मुली बेपत्ता होण्याच्या घटनांमुळे कुटुंबीयांची चिंता वाढली या प्रकरणामागे नेमके कारण काय त्यांना कोणी लालूच पैसे देऊन घेऊन तर जात नाही अशी चर्चा सध्या सुरू आहे एमआयडीसी पोलीस अधिकारी व पोलिसांकडून शोध घेण्याचे कार्य सुरू असून लवकरच त्याचा शोध लावणार आणखी यापूर्वी बेपत्ता झालेले आणि या दोन दिवसांमध्ये बेपत्ता झालेल्या कुटुंबीयांनी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये येऊन संपूर्ण माहिती देऊन जावी असे एमआयडीसी पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button