जिल्हा जळगाव भुसावळ मध्य रेल्वेचे मुख्य तिकीट निरीक्षक शेखर गोटले व सुरेश आडे सेवानिवृत्त.श्री कृष्ण चंद्र सभागृहात दिमाखदार निरोप समारंभ संपन्न

भुसावळ प्रतिनिधी (गोपी अण्णा) मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील मुख्य तिकीट निरीक्षक शेखर शंकर गोटले आणि सुरेश रामचंद्र आडे हे नुकतेच रेल्वे सेवेतून सेवानिवृत्त झाले. त्यांच्या प्रदीर्घ आणि गौरवशाली सेवेचा सन्मान करण्यासाठी रेल्वेच्या श्री कृष्ण चंद्र सभागृहात १ ऑगस्ट रोजी एका दिमाखदार निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.शेखर गोटले यांनी रेल्वे विभागात तब्बल ३८ वर्षे, तर सुरेश आडे यांनी ३२ वर्षे अविरत व प्रामाणिक सेवा बजावली. या दोघांच्या प्रदीर्घ अनुभवाचा आणि कर्तव्याचा रेल्वे प्रशासनाला मोठा लाभ झाला. त्यांच्या या योगदानाबद्दल सेवानिवृत्ती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांचा निरोप घेऊन यथोचित सन्मान करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून डिव्हीजनल चीफ टिकीट निरीक्षक एस.पी.कांबळे सिटीआय चेक बि.आर.भगत,आयआरटीसीएसओ चे अध्यक्ष धिरज कुमार हे व्यासपीठावर उपस्थित होते रेल्वेच्या तिकीट चेकिंग स्टाफतर्फे दोन्ही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना मान्यवरांतर्फे शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून गोटले व आडे यांच्या रेल्वे सेवेतील उत्कृष्ट कामगिरीचा गौरव केला व त्यांच्या पुढील भावी आयुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.दोघांच्या मित्रमंडळींनीही जुन्या आठवणींना उजाळा देत त्यांना शुभेच्छा दिल्या. या कौटुंबिक आणि भावनिक सोहळ्याला तिकीट चेकिंग स्टाफचे बापू पाटील,भवानी शंकर, के.सी.तायडे,एस के सलीम,बी पी सिंग, सत्यजीत माधवान, लीलाधर पाटील,निसार खान,एस के इम्रान,शेख सलीम,अभिषेक नामदेव सेवानिवृत्त सीनियर डीसीएम एन.जी. बोरीकर यांच्यासह रेल्वेचे अनेक कर्मचारी तसेच दोन्ही अधिकाऱ्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.फोटो कॅप्शन – भुसावळ येथील रेल्वे चे मुख्य तिकीट निरीक्षक शेखर गोटले व सुरेश आडे यांना दोघींना सेवा निवृत्ती निमीत्त निरोप देतांना भुसावळातील चेकिंग स्टॉप चे बापू पाटील,भवानी शंकर, के.सी.तायडे एस के सलीम,बी पी सिंग, सत्यजीत माधवान लीलाधर पाटील,निसार खान,एस के इम्रान,शेख सलीम,अभिषेक नामदेव आदि उपस्थित होते










