ताज्या बातम्या

जळगाव शहराकरीता मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांचे दुरदृष्टीतुन 250 कोटी रुपये खर्च होऊन मेहरूण सर्व्हे नंबर 343 मध्ये विभागीय क्रीडा संकुलाचे काम युद्धपातळीवर


जळगाव शहराकरीता मा.ना.गिरीषभाऊ महाजन यांचे दुरदृष्टीतुन 250 कोटी रुपये खर्च होऊन मेहरूण सर्व्हे नंबर 343 मध्ये विभागीय क्रीडा संकुल चे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हल्ली वापरात असलेला रस्ता कच्चा व वहिवटीचा आहे. शहराला भव्य अशी नागरी सुविधा उपलब्ध केली जात असून त्यास रस्ता देखील प्रशस्त असणे आवश्यक आहे.
या करीता आज प्रत्यक्ष जागेवर पहाणी करण्यात आली. या प्रसंगी महापौर सौ. दिपमाला काळे यांचे समवेत मा. श्री. प्रवीण गेडाम (भा. प्र. से.), विभागीय आयुक्त, नाशिक. जिल्हाधीकारी जळगाव. आयुक्त म.न.पा. जळगाव. व मनपा चे अधिकारी यांनी संयुक्त भेट दिली. पाहणीदरम्यान सध्या प्रत्यक्ष वापरात असलेलाच विद्यमान रस्ता विभागीय क्रीडा संकुलाच्या वापरासाठी उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त, जळगाव महानगरपालिका, सहाय्यक संचालक नगररचना विभाग जळगाव महानगरपालिका तसेच उपस्थित सर्व संबंधित अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले. त्यानुसार सदर प्रकरणी आवश्यक ती कार्यवाही तातडीने व प्राधान्याने करण्यात येणार आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button