ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा कुरंगी येथे वाढदिवसाचे औचित्य साधत जि.प. शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप नेहमी समाजसेवा करण्याची आवड असणारे सेवानिवृत्त स.फौ. भास्कर नथ्थु पाटील


कुरंगी – पाचोरा येथे वाढदिवसाचे औचित्य साधत जि.प. शाळेत गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य मोफत वाटप कुरंगी येथील नेहमी समाजसेवा करण्याची आवड असणारे सेवानिवृत्त स.फौ. भास्कर नथ्थु पाटील यांनी दि.1 जूलै 2026 रोजी वाढदिवसाचे औचित्य साधत जि.प.शाळेत 100 गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप केले. व समाजात एक नवा आदर्श निर्माण केला. त्यावेळी गावातील प्रतिष्ठित समाजसेवक अशा या आगळ्या वेगळ्या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. अशाप्रकारे कार्यक्रमामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी फार मोठी मदत होणार आहे.शिक्षण हे एक जिवनाचे महत्त्वाचे अंग आहे शिक्षणाचा पाया मराठी शाळेत पक्का झाला तर इमारत पक्की होत असते मी सदैव गरजू विद्यार्थ्यांना यापुढेही मदत करण्याचा संकल्प केला आहे असे मत भास्कर पाटील यांनी व्यक्त केले.सदरहू शाळेचे मुख्याध्यापक श्री देसले व गावातील मिडिया पत्रकार अजय जैस्वाल यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार मानले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button