ताज्या बातम्या

Solapur mangalwada ऑपरेशन शोध मोहिमे _अंतर्गत बेपत्ता झालेल्या 123 व्यक्तींचा शोध घेण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉक्टर आरती आरती कणिरे यांना यश मिळाले


सोलापूर ;मंगळवेढा(प्रतिनिधी) :मंगळवेढा पोलीस ठाणे अंतर्गत ऑपरेशन शोध मोहिम राबवून बेपत्ता झालेल्या 73 महिला व 50 पुरुष असे एकूण 123 बेपत्ता व्यक्तींना शोधण्यात महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांना यश आले आहे दरम्यान या शोध मोहिमेत सोलापूर जिल्ह्यात मंगळवेढा अव्वल ठरला आहे राज्याच्या अप्पर पोलीस महासंचालक महिला व बाल अपराध प्रतिबंधक विभागाकडून राज्यभर बेपत्ता व्यक्तींचा शोध घेण्यासाठी ऑपरेशन शोध मोहिम सर्वत्र राबविण्यात आली दरम्यान मंगळवेढ्यात जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशाने डी.वाय.एस.पी डॉ.बसवराज शिवपुजे,पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक डॉ.आरती कणिरे यांनी मंगळवेढ्यातून बेपत्ता झालेल्या 73 महिला व 50 पुरुष असे एकूण 123 व्यक्तींना शोधून काढले आहे हे सर्व सन 2016 ते 30 मे 2026 या कालावधीतील आहेत कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात पुणे मुंबई लातूर यवतमाळ परभणी आदी ठिकाणाहून लोकेशन व सी.डी.आर. या तांत्रिक माध्यमातून त्यांचा शोध घेण्यात आला आहे महिला पोलीस उपनिरीक्षक आरती कणिरे यांनी मंगळवेढ्याचा कार्यभार घेतल्यानंतर 35 बेपत्ता असलेल्या मुलींनाही शोधण्यात यश मिळविले आहे डी.वाय.एस.पी.डॉ.बसवराज शिवपुजे यांनी वेळोवेळी या घटनांचा आढावा घेवून त्यांनी मार्गदर्शन केले होते.तपास शोध कामात पोलीस हवालदार श्रीराम ताटे,पोलीस अंमलदार राहुल सोनकर यांनीही परिश्रम घेतले.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button