ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा ‘Transforming Bharat @ 2047’ पुस्तकातील प्रा. सौ. जयश्रीताई वाघ लिखित ‘Cultural Renaissance and National Identity’ अध्यायाचे प्रकाशन संपन्न प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या पुस्तकातील अध्यायाचे प्रकाशन


BRIDGING DISCIPLINE – Transforming Bharat @ 2047 through Multidisciplinary Perspectives” या पुस्तकातील श्री शेठ मुरलीधरजी मानसिंगका साहित्य, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, पाचोरा येथील प्राध्यापिका प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांनी लिहिलेल्या “Cultural Renaissance and National Identity” या अध्यायाचे प्रकाशन दिनांक १३ जून २०२६ रोजी करण्यात आले.यावेळी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी आमदार दिलीपभाऊ वाघ, संस्थेचे चेअरमन नानासाहेब संजय वाघ तसेच माजी नगरसेविका सौ. सुचेताताई वाघ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले तर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वले सर, उपप्राचार्य डॉ. जे. व्ही. पाटील सर, वाणिज्य विभाग प्रमुख डॉ. पुरी सर तसेच साळुंखे सर उपस्थित होते.या पुस्तकात भारताच्या २०४७ पर्यंतच्या विकासाच्या दृष्टीने विविध विषयांवर लेख समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांनी सांस्कृतिक पुनर्जागरण आणि राष्ट्रीय ओळख या विषयावर आपले विचार मांडले आहेत.प्रा. सौ. जयश्रीताई वाघ यांच्या या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या या यशाबद्दल महाविद्यालय व परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button