ताज्या बातम्या

संमिश्र न्यूज//_ श्रीराम जन्मभूमी मंदिर दान पेटीमधील पैसे गायब 4 जणांना अटक राम जन्मभूमी येथील दानपेटीतील पैसे चोरताना सीसीटीव्ही फुटेज मुळे चोरी पकडली गेली पैसे मोजताना त्याच कर्मचाऱ्यांनी पैशांची अफरातफर केली जळगाव जिल्ह्यातील एमआयडीसी पोलीस अंतर्गत 22 लाख रुपये किमतीचा अवैध गुटखा पान मसाला पकडला कार्यवाही संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरू असून अवैध गुटखा पान मसाला अवैध धंद्यांविरुद्ध झिरो टॉलरेस कायद्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी वादळी वारे गारपीट झाल्यामुळे केळी पिकाचे नुकसान


राज्यात अनेक ठिकाणी अवैध व्यवसायांविरुद्ध कार्यवाही सुरू झाल्यामुळे अवैध धंदे करणाऱ्यां व्यावसायिकांचे धाबे दनाणले आहे झिरो टॉलरेस कायद्यानुसार कडक कार्यवाही झाल्यामुळे संपूर्ण राज्यात गुटखाबंद झालेला आहे गुटखा बंद असताना गुटखा येतो कुठून? इतके दिवस गुटखा कंपन्या सील करण्यात सरकारची हरकत का गेली नाही गुटखा कंपनीला कोणाचा आशीर्वाद यातच गुटखा पान मसाला यांची परिस्थिती महाराष्ट्र राज्यात हाताळण्याचा पलीकडे गेली होती त्यामुळे ADF आयुक्त तुकाराम मुंढे यांची नेमणूक अन्न व औषध प्रशासनाने या विभागामध्ये केली आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कार्यवाही सुरू ज्या पद्धतीने आयुक्त तुकाराम मुंढे साहेबांनी आठ ते दहा दिवसात गुटखा माफीयांना सळो की पळो करून सोडले अशी परिस्थिती निर्माण झाली हप्ते बंद होण्यास सुरुवात झाली आणि अशा परिस्थितीत तुकाराम मुंढे साहेबांची बदली करण्याची चर्चा सुरू झाली आहे आतापर्यंत सगळ्यात जास्त बदली ADF आयुक्त तुकाराम मुंढे साहेब यांची झाली जळगाव एमआयडीसी पोलिसांनी प्रतिबंधित पकडलेला गुटखा 21 लाख 61 हजार सहाशे रुपये किमतीच्या विमल सुगंधित गुटखा आणी पान मसाला 7 लाख रुपयाचे चार चाकी मालवाहतूक वाहन असा एकूण 28 लाख 61 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जळगाव पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी आदेश जारी केला की अवैध धंद्या विरोधात क** कार्यवाही करण्याचे आदेश जळगाव जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आदेश दिले एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना 9 जून 2026 रोजी गोपनीय माहिती मिळाली त्यानुसार जळगाव शहरातून महामार्गाने प्रतिबंधित गुटख्याची मोठी वाहतूक होणार असून त्यानुसार एमआयडीसी पोलीस स्टेशनचे विशेष पथक तयार करण्यात आले माहिती मिळाल्यानुसार पोलिसांनी अचूक कार्यवाही केली या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला असून या गुन्ह्यात वाहन चालक जोगेंद्र भिका पाटील याला ताब्यात घेण्यात आले असून तो फुलपाट तालुका धरणगाव जिल्हा जळगाव येथे राहतो या गुन्ह्याच्या तपास उपनिरीक्षक चंद्रकांत धनके करीत आहे सदरची महत्वपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे अप्पर पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके सहाय्यक फौजदार विजयसिंह पाटील पोलीस हेडकॉन्स्टेबल गिरीश पाटील लाड वंजारी यांच्या पथकाने केली आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button