जिल्हा जळगाव तालुका भुसावळ भंगार-कोळसा चोरट्यांवर पोलिसांचा करारा प्रहार; संयुक्त मोहिमेत मोठी कारवाई परत परत चोरी करू नये यासाठी आता त्या कायद्यानुसार गुन्हेगारांवर कलमासह क** गुन्हे दाखल होणार मा; एस पी सो: जळगाव

भुसावळ प्रतिनिधी: (गोपी अण्णा) भुसावळ शहर व परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच रेल्वे आणि दीपनगर पॉवर प्लांट परिसरातील भंगार व कोळसा चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी जळगाव पोलीस दल आणि रेल्वे सुरक्षा बल (RPF) यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी पहाटे 4 ते सकाळी 8 या वेळेत व्यापक ‘कॉम्बिंग ऑपरेशन’ राबविण्यात आले. या कारवाईत अनेक आरोपींना अटक करण्यात आली असून अवैध शस्त्रांसह चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या नेतृत्वात ही मोहीम पार पडली कारवाईदरम्यान रेल्वे पोलीस ठाण्याचे तीन गैर_ जामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले. त्यापैकी सराईत आरोपी श्याम सुभाष शिरसाट (उर्फ श्याम काल्या) याला अटक करून रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.पंचशील नगर परिसरातून बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील पाहिजे असलेला आरोपी शोहेब शाह शरीफ शाह याच्याकडून एक कोयता जप्त करण्यात आला. त्याच्यावर भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दीपनगर पॉवर प्लांट परिसरात राजू सुरवाडे (रा. निंभोरा) याच्याकडून चोरीच्या गुन्ह्यातील सुमारे 50 किलो केबल व केबल कापण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. या कारवाईमुळे चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला असून त्याच्यावर संबंधित कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे.मोहीमेदरम्यान रेल्वे व दीपनगर परिसरातील भंगार व कोळसा चोरीशी संबंधित 60 सराईत गुन्हेगारांच्या घरांची झाडाझडती घेण्यात आली. तसेच २७ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले, तर पाच भंगार दुकानांची तपासणी करण्यात आली.याशिवाय संशयित व आरोपींची अद्ययावत डिजिटल नोंद तयार करून जळगाव पोलीस आणि RPF यांच्यात माहितीची देवाणघेवाण करण्यात आली, ज्यामुळे भविष्यातील गुन्ह्यांवर अधिक प्रभावी नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे.या कारवाईत पोलीस व RPF चे 11 अधिकारी, 53 कर्मचारी तसेच जळगाव मुख्यालयातील तीन RCP प्लाटून सहभागी झाले होते.रेल्वे व शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्यांविरुद्ध अशाच स्वरूपाच्या कारवाया यापुढेही सातत्याने सुरू राहतील, असे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.











