जिल्हा जळगाव तालुका भडगाव येथे संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी; भव्य पालखी मिरवणूक व नवनिर्मित सभागृहाचे लोकार्पण

भडगाव (प्रतिनिधी ) विजय माळी
येथील श्री संत सेना महाराज नाभिक समाज विकास मंडळाच्या वतीने संत शिरोमणी सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहात साजरी करण्यात आली. या पुण्यतिथीचे औचित्य साधून नव्याने बांधण्यात आलेल्या नाभिक समाज सभागृहाचे उद्घाटन आमदार किशोर पाटील यांचे सुपुत्र युवा नेते सुमित पाटील यांच्या हस्ते करून हे सभागृह समाज बांधवांसाठी खुले करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता विठ्ठल रुक्मिणी मंदिरात संत सेना महाराज यांच्या प्रतिमेच्या प्राणप्रतिष्ठेने झाली. मंडळाचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते विधीवत पूजन करण्यात आले. तसेच सभागृह वास्तु_ शांती निमित्ताने सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. रात्री श्रीराम भजनी मंडळाच्या भक्तीमय भजनांनी जागरणाचा कार्यक्रम रंगला.8 सप्टेंबर रोजी सकाळी मंदिर परिसरापासून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक शिवाजी नगर, शिवशक्ती कॉलनी, बाळद रोड, बस स्टँड परिसर, मेन रोड आणि पाचोरा रोड मार्गे जात पुन्हा मंदिराजवळ येऊन तिची सांगता झाली.दरम्यान पालखी मिरवणुकीत चर्मकार सघाचे तालुकाध्यक्ष रविंद्र अहिरे, पत्रकार शिवदास महाजन, नितीन महाजन आरोग्य निरीक्षक सजय सोनार यांनी दर्शन घेतले मिरवणुकीनंतर आयोजित कार्यक्रमात पाचोरा नगरपरिषद गटनेते सुमित पाटील, गटनेता लखिचद पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार, उपनगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील, प्रदीप मालचे, नगरसेवक किशोर बारावरकर, डॉ. विजयकुमार देशमुख, जग्गू भाई, विजयकुमार भोसले, अमोल पाटील, देवाजी अहिरे, सचिन चोरडिया, संतोष महाजन, आरपीआयचे तालुकाध्यक्ष सुपडू खेडकर, रवींद्र अहिरे, सचिन वखरे पाचोरा तसेच नाभिक समाजाचे ज्येष्ठ नारायण निकम, पोपट नेरपगारे, निर्मलाबाई शिरसाठ यांसह विविध मान्यवर व्यास पीठावर उपस्थित होते.
एकजुटीने काम केल्यास समाजाची प्रगती नक्की: सुमित पाटील आपल्या मनोगतात युवा नेते सुमित पाटील म्हणाले, “समाजाने एकजुटीने कार्य केल्यास प्रगती निश्चित होते. नाभिक समाजाचे पाठबळ नेहमीच आमदार किशोर पाटील यांच्या पाठीशी राहिले आहे. भविष्यातही समाजाच्या आवश्यक गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव तत्पर राहू.” असे सागतले. माजी नगराध्यक्ष प्रशांत पवार यांनीही मनोगत व्यक्त करताना समाजाच्या एकजुटीवर भर दिला आणि मदतीचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अध्यक्ष संजय पवार यांनी केले, ज्यामध्ये त्यांनी सभागृह बांधकाम दरम्यानचे अनुभव सांगत सहकार्य करणाऱ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. भरत ठाकरे यांनी केले. या सोहळ्यास जळगावचे खोंडे ज्वेलर्सचे संचालक संतोष खोंडे , महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या महिला प्रदेशाध्यक्ष भारतीताई सोनवणे आणि जिल्हाध्यक्ष किशोर वाघ यांनी भेट देऊन सभागृहाच्या बांधकामाबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच राजु आण्णा मित्र परीवारवतीने कार्यकारणीनीचा सत्कार गोरख वेळीस यानी केला. यानंतर उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेतल्यानंतर कार्यक्रमाची सांगता झाली.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी अध्यक्ष संजय पवार, उपाध्यक्ष रवींद्र शिरसाठ, सचिव अॅड. भरत ठाकरे, खजिनदार दीपक शिरसाठ, सुभाष ठाकरे, नारायण नेरपगारे, दिलीप शिरसाठ, किशोर निकम, विनोद शिरसाठ, भगवान पगारे, नामदेव चव्हाण, संभाजी वेळीस्कर, सूर्यभान वाघ, राकेश शिरसाठ, गोरख वेळीस, निलेश महाले (पत्रकार), प्रभाकर नेरपगारे, काशिनाथ शिरसाठ, नंदू ठाकरे, भास्कर पवार आणि संदीप वाघ सह सर्व समाज बाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.











