भडगाव येथील प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे आंदोलन मागे देशामध्ये विविध राज्यात जिल्ह्यात तालुक्यात वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन रोजच सुरूच असतात लोक _शाहीत समस्यांचे समाधान कधी होणार? आंदोलनाचे दोन प्रकार असतात freedom of the country हे आंदोलन महात्मा गांधी यांनी केले दुसरे आंदोलन development of country and development of the people of country हे स्वातंत्र्याचे दुसरे आंदोलन हे आंदोलन बहुजन महापुरुषांचे म्हणजेच राजे छत्रपती शिव शाहू महात्मा फुले डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे होते देशाबरोबर जनतेचा विकास होण्यासाठी हे आंदोलन होते आता नफ्यामध्ये ज्या इंडस्ट्रीज कंपन्या सरकारी मालकीच्या होत्या त्या बंद केल्या आणि आता प्रायव्हेटी करणांमध्ये देशाच्या जनतेचा विकास होणार का?

जिल्हा जळगाव तालुका भडगाव (प्रतिनिधी ) विजय माळी
भडगाव संजय गांधी निराधार योजने अंतर्गत पात्र दिव्यांग बांधवांचे गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून थकीत असलेले मानधन तातडीने द्यावे, तसेच पात्र दिव्यांगांचा अंत्योदय रेशन योजनेत समावेश करावा, या मागण्यांसाठी प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सोमवारी तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. प्रशासनाकडून लेखी आश्वासन मिळाल्यानंतर दुपारी उपोषण मागे घेण्यात आले.पात्र दिव्यांगांनी तालुक्यातील आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही अनेकांना पाच ते सहा महिन्यांपासून उपोषणाचा इशारा तहसीलदार शीतल सोलाट यांना दिला यापूर्वीच संघटनेने होता.संजय गांधी योजनेचे मानधन मिळालेले नाही. याबाबत चौकशीसाठी तहसील कार्यालयात वारंवार चकरा माराव्या लागत असून, ‘पोर्टल बंद आहे’ असे उत्तर दिले जाते. प्रशासनाने याबाबत तातडीने पाठपुरावा करून थकीत मानधन अदा करावे, अशी मागणी करण्यात आली. पात्र दिव्यांगांनी पुरवठा शाखेकडे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही शहर व तालुक्यातील अनेक दिव्यांगांचा अंत्योदय रेशन योजनेत समावेश झालेला नसल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.शासनाचे परिपत्रक असतानाही त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप करण्यात आला.अखेर उपोषण मागे मंगळवारी सकाळी 11 वाजता उपोषणास सुरुवात करण्यात आली. यावेळी संजय गांधी योजनेचे तहसीलदार रमेश देवकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलकांशी चर्चा केली. लेखी आश्वासन दिल्यानंतर दुपारी उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी संगायो योजनेचे अधिकारी एस. डी. सोनवणे उपस्थित होते.उपोषणावेळी जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, चंद्रशेखर सिंहले, धर्मराज पाटील, राजू परदेशी, करतारसिंग रामसिंग परदेशी, रत्नाबाई निकम, भरत धोबी, भारत पाटील, संजय कोळी, गजानन तांबटकर, नीलेश पाटील, रवी पाटील, अविनाश मराठे, आनंदा पाटील, राजेंद्र पाटील उपस्थित होते









