ताज्या बातम्या

जलजीवन मिशन योजनेच्या कामांचे 3/13 महिंदळे गावातील ग्रामस्थांचे आमरण उपोषण जि; जळगाव भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात 2022 ते 2026 अंतर्गत जलजीवन मिशन झालेल्या कामांचे स्वरूप बंद अवस्थेत महिंदळे गावातील बस स्टॉप येथे बसवलेल्या एक्वा शुद्ध पेयजल बंद अवस्थेत जल जीवन मिशनचा पैसा गेला कुठे त्यामुळे ग्रामस्थ बसले आमरण उपोषणाला


संपूर्ण महाराष्ट्रात जलजीवन मिशन योजना फेल गेल्याचे चित्र समोर दिसत आहे दिनांक 15/ 5/ 2026 भडगाव तालुक्यातील महिंदळे गावात 2022 ते 2026 अंतर्गत काम पूर्ण होण्याबाबत महिंदळे गावातील ग्रामस्थांनी तोंडी व लेखी तक्रार अर्ज दिला होता परंतु ग्रामपंचायत ने ग्रामस्थांच्या अर्जाला कचऱ्याचा डबा दाखवला महिंदळे येथील बस स्टॉप येथे बसवलेल्या एक्वा शुद्ध पेयजल बंद अवस्थेत वेळेवर उन्हाळ्याच्या दिवसात पाणी मिळत नसल्याची तक्रार घेऊन सुद्धा महिंदळे गावाच्या ग्रामसेवक व सरपंचांनी दखल घेतली नाही ग्रामस्थांना शेवटी आमरण उपोषणाची वेळ आली प्रत्येक ग्रामपंचायला कोटी रुपये सरकारकडून येतात परंतु पैशाचा हिशोब ग्रामसभेत ग्रामसेवक सरपंच ग्रामपंचायतचे सदस्य देत नाही निरुतर अनेक कारणे दाखवून ग्रामसभा झाल्याचे काही ठिकाणी चित्र दिसून आलेले आहे ग्रामसभा ही कशासाठी असते तर संपूर्ण वर्षभरात जी कामे ग्रामपंचायतने केली आहे त्याचा लेखाजोगा जनतेसमोर ग्रामस्थांसमोर मांडणे यामुळे गावाचा विकास होतो गावातील ग्रामस्थांना माहिती मिळते माहिती तर दिलीच नाही ज्या कामासाठी पैसा निधी शासनाचा आला होता ते काम सुद्धा अपूर्ण अवस्थेत त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसात अत्यंत महत्त्वपूर्ण पिण्यासाठी लागणारे पाणी सर्वात महत्त्वाचे असते एक्वा शुद्ध जल बसवून त्याचा फायदा काय ग्रामस्थांना पाणी न मिळाल्यामुळे आणि लाखो रुपये खर्चून पेयजल बंद अवस्थेत का आहे याची विचारणा केली असता ग्रामसेवक सरपंच यांनी काही उत्तर दिले नाही शेवटी तक्रार अर्ज करूनही बंद स्वरूपाचा एक्वा शुद्ध पेयजल सुरू केला नाही आणि ते कधी सुरू करणार याबाबत उत्तर मिळाले नाही आणि विषय लांबत गेला शेवटी ग्रामस्थांना आमरण उपोषणाला बसण्याची वेळ आली प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये सरकार लाखो रुपये जनतेच्या सुविधासाठी देत असते परंतु कमिशनबाजीमुळे कामे व्यवस्थित होत नाही ग्रामपंचायतीचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे तक्रार अर्ज करूनही दखल घेतली जात नाही आलेला निधी कुठे खर्च झाला याचा हिशोब देत नाही शेवटी लोकशाहीचे हत्यार ग्रामस्थांनी उपसले व आमरण उपोषणाला बसले


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button