जळगाव शहर महानगर पालिकेत 1 में महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा कष्टकऱ्यांच्या घामाने घडला महाराष्ट्र महान संघर्ष स्वप्न आणि जिद्दीची ओळख अभिमानाची शान महाराष्ट्र दिन साजरा जळगावच्या महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते जनगणना अभियानाचा शुभारंभ

जळगाव : येथील जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रांगणात आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन अत्यंत उत्साहात आणि चैतन्याच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी महानगरपालिकेच्या वतीने आयोजित ध्वजारोहण सोहळा महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते पार पडला.या सोहळ्याला उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त आयुक्त शोभा बाविस्कर यांच्यासह मनपाचे उपायुक्त, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते प्रफुल्ल देवकर, नगरसेवक दीपक सूर्यवंशी, वंदना इंगळे, रिटा सपकाळे, डॉ. विश्वनाथ खडके, विजय बांदल, नरेंद्र पाटील यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रभक्तीपर वातावरणात झाली. महापौर दीपमाला काळे यांच्या हस्ते राष्ट्रध्वजाचे आरोहण करण्यात आले. मनोगतातून महापौरांनी उपस्थितांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यानंतर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.सर्व शिक्षा अभियानाचे (शिक्षण विभाग मनपा, जळगाव) सेवानिवृत्त सहाय्यक कार्यक्रम अधिकारी हरिश्चंद्र शंकर सोनवणे यांचा यावेळी महापौरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. मान्यवरांनी अग्निशमन विभागाच्या पथ संचलनाची पाहणी करून कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या कार्यक्रमाच्या शेवटी, उपायुक्त निर्मला गायकवाड यांनी उपस्थित सर्वांना जनगणना विषयक सविस्तर माहिती दिली. या माहितीच्या आधारे महापौर दीपमाला काळे यांनी आपल्या मोबाईलमध्ये जनगणना विषयक आवश्यक माहिती भरून स्वतःची नोंदणी पूर्ण केली. या अभिनव प्रक्रियेमुळे जळगाव शहर महानगरपालिकेच्या जनगणना अभियानाचा अधिकृत शुभारंभ महापौरांच्या हस्ते यशस्वीरीत्या संपन्न झाला.














