ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा येथील फातेमाताई आणि जितेश भाऊ यांनी अशाच प्रेरणादायी घटनेत बीएसएफच्या जवानांच्या आजारी वडिलांसाठी रक्तदान करून मानवतेचा आदर्श घालून दिला यालाच खरे देशप्रेमी म्हणतात आज-काल काही लोक खोटे प्रेम दाखवून केसाने गळा कापणारे भरपूर लोक आहेत पैशासाठी काहीही करायला तयार असतात परंतु चांगल्या कामासाठी असाच साथ_ संयोग देणारे खूप कमी लोक असतात आजचे उदाहरण देश प्रेमासाठी फार मोठे आहे तर_ _ फातिमा ताई आणि जितेश भाऊ यांनी खरे देश प्रेम आज दाखवले


28/06/2026 पाचोरा:-
फातेमा ताई तुम्हाला सलाम
जितेश भाऊ तुम्हाला सलाम
सीमेवर देशाचे रक्षण करणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक मार्ग आहेत, पण त्याच्या कुटुंबाच्या अडचणीच्या वेळी पुढे येऊन मदत करणे हे खरे राष्ट्रसेवेचे उदाहरण ठरते. अशाच एका प्रेरणादायी घटनेत आपल्या शहरातील एका सजग व संवेदनशील महिला श्रीमती.फातेमा मुर्तुजा नगारिया मुर्तुजा हार्डवेअरचे संचालक श्री मुर्तुजा नगरिया यांची पत्नी जी एक लेखापाल (Accountant) असून गृहिणीही आहे व मोबाईल व्यवसायीक श्री जितेश पंजवाणी या दोघांनी बीएसएफच्या जवानाच्या आजारी वडिलांसाठी रक्तदान करून मानवतेचा आदर्श घालून दिला आहे ही महिला एकाच वेळी गृहिणी, लेखापाल आणि जबाबदार नागरिक म्हणून आपली भूमिका पार पाडत असताना, समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी त्यांनी कृतीतून दाखवून दिली आहे कोणतीही प्रसिद्धी किंवा अपेक्षा न ठेवता, केवळ मानवतेच्या भावनेतून केलेले हे रक्तदान अत्यंत प्रेरणादायी आहे.आजच्या काळात समाजात अनेकदा स्वार्थी विचार दिसून येतात परंतु अशा कार्यामुळे मानवतेवरील विश्वास अधिक दृढ होतो. एका सैनिकाच्या कुटुंबाला संकटकाळात दिलेली ही मदत म्हणजे देशसेवेलाच दिलेला मान आहे.अशा कर्तृत्ववान महिलेचा सन्मान होणे ही केवळ गरज नसून, ती समाजाची जबाबदारी आहे. शहरातील मान्यवर राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते व विविध संस्थांनी पुढाकार घेऊन या महिलेचा सार्वजनिक सत्कार करावा जेणे करून समाजात अशा सेवाभावी कार्यांना प्रोत्साहन मिळेल.या घटनेतून सर्व महिलांनी आणि नागरिकांनी प्रेरणा घ्यावी व गरज पडेल तेव्हा रक्तदान करून मानवतेची सेवा करावी अशा निःस्वार्थ कृतीमुळेच समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम बनतो.रक्तदान हेच खरे महादान आहे.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button