ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा सिंधी कॉलनी येथे पूज्य सिंधी जनरल पंचायत श्री झुलेलाल मंदिर व भारतीय सिंधू सभा पाचोरा तर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही 10 एप्रिल रोजी सिंधी भाषा दिन मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला.भारतीय सिंधू सभा ही भारताची संस्कृती आहे आजही सिंधू संस्कृतीचे अवशेष भारत देशात आहे


1967 साली सिंधी भाषेला भारतीय संविधानाच्या Eighth Schedule of the Indian Constitution मध्ये स्थान मिळाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो.
या कार्यक्रमात समाजातील मान्यवर, ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सिंधी गीत, कविता सादरीकरण, तसेच सिंधी संस्कृतीवर आधारित भाषणे यांचा समावेश होता.यावेळी वक्ता भारतीय सिंधू सभा युवा विंग चे सचिव अँड राजेंद्र.डी.वासवाणी यांनी सांगितले की, भारताच्या महामहीम माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु तसेच उपराष्ट्रपती सि.पी.राधाकृष्णन यांनी या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून भारतीय संविधानाचे सिंधी भाषेतील संस्करण प्रकाशित करून सिंधी भाषेला विशेष गौरव दिला आहे. सोबत नविन पिडीला आपली मातृभाषा विसरू नका, मातृभाषेत बोला हे ही संदेश दिले.कार्यक्रमात BSSY चे प्रदेश सचिव श्री राकेश पुर्सनाणी व श्री सतीश सर शामनाणी यांनी सिंधी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, अखंड भारताच्या फाळणीनंतर संपूर्ण भारतभर विखुरलेल्या सिंधी समाजाने आपली भाषा आणि संस्कृती जपण्याचे मोठे कार्य केले आहे. ही परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.यावेळी समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. तसेच युवकांना सिंधी भाषा शिकण्याचे आणि तिचा वापर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन समाजातील एकता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्याचा संकल्प केला. यावे वेळी भारतीय सिंधू सभा युवा चे श्री राकेश पुर्सनाणी , श्री मनोज केसवाणी ,अँड राजेंद्र.डी.वासवाणी , श्री सतीश सर शामनाणी, श्री जितेश नागराणी, हरिओम केसवाणी उपस्थित होते. सिंधू संस्कृती आजही मोहेंजोदडो हडप्पा या ठिकाणी पाहायला मिळते म्हणजेच भारतातील संस्कृती ही सिंधू संस्कृती होती


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button