जळगाव महापौर दीपमाला यांची तत्परता : शेठ ला.ना. विद्यालयाच्या प्रवेश द्वारावरील साचलेल्या पाण्याचा निचरा करून स्वच्छता आरोग्य विभागाकडून तातडीने कार्यवाही केल्यामुळे शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षिका यांनी महापौर दीपमाला काळे यांचे आभार मानले महानगरपालिकेला एकच पत्र दिले आणि अवघ्या 24 तासात दखल घेतली आणि काम पण मार्गी लावले

जळगाव (प्रतिनिधी): शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या प्रसिद्ध लालजी नारायण माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर गेल्या काही दिवसांपासून साचलेल्या गढूळ पाण्याचा प्रश्न महापौरांच्या तत्परतेमुळे मार्गी लागला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका लक्षात घेऊन महापौर दीपमाला काळे यांनी दिलेल्या आदेशानुसार, शुक्रवारी सकाळीच महापालिकेच्या आरोग्य विभागाने या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवून परिसर चकाचक केला.शेठ लालजी नारायण विद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गढूळ पाण्याचा निचरा न झाल्याने मोठे डबके साचले होते. यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली होती आणि डासांचा प्रादुर्भाव वाढला होता. शाळेत येणाऱ्या शेकडो विद्यार्थी आणि शिक्षकांच्या आरोग्याला यामुळे मोठा धोका निर्माण झाला होता. या गंभीर समस्येबाबत विद्यालयाच्या मुख्याध्यापकांनी गुरुवारी (9 एप्रिल) महापौर दीपमाला काळे यांना लेखी पत्र देऊन लक्ष घालण्याची विनंती केली होती.पत्राचे गांभीर्य ओळखून महापौरांनी तातडीने संबंधित विभागाला कार्यवाहीचे आदेश दिले. त्यानुसार, आज शुक्रवारी (10 एप्रिल) सकाळीच महापालिकेचे आरोग्य कर्मचारी यंत्रणेसह विद्यालयात पोहोचले. कर्मचाऱ्यांनी साचलेल्या पाण्याचा निचरा करून संपूर्ण परिसराची स्वच्छता केली. महापालिकेच्या या जलद कारवाईमुळे शाळेचा परिसर आता स्वच्छ आणि सुरक्षित झाला आहे.मुख्याध्यापकांच्या पत्राची अवघ्या २४ तासांत दखल घेऊन समस्या सोडवल्याबद्दल शाळा व्यवस्थापनाच्या वतीने महापौरांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधींनी अशाच प्रकारे तक्रारींची तात्काळ दखल घेतल्यास शहराचे प्रश्न वेगाने सुटतील, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
“माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ मोहिमेला गती महापौर दीपमाला काळे यांनी शहरात ‘माझं जळगाव, स्वच्छ जळगाव’ ही संकल्पना राबवण्यास सुरुवात केली आहे. स्वच्छतेच्या बाबतीत त्यांनी कठोर पावले उचलली असून, शहरातील कोणत्याही भागात कचरा किंवा सांडपाण्याची समस्या उद्भवल्यास त्यावर तातडीने उपाययोजना करण्यावर त्यांचा भर आहे.











