ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षक किसन सूर्यवंशी यांचे जाहीर व्याख्यान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकडी तांडा येथील मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले किसन सूर्यवंशी यांचे म्हसदे ता: साक्री : जिल्हा धुळे , येथे दि १३ एप्रिल रोजी डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व्याख्यान आयोजन करण्यात आले आहे


मूळचे लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातील धनेगाव येथील रहिवाशी असलेले व सध्या पाचोरा तालुका येथील कोकडी तांडा येथे जिल्हा परिषद शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेले शिक्षक हे स्वतः लेखक असून त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित आहे तसेच फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रचार प्रसार करतात बंजारा समाज व आदिवासी समाजाच्या हक्क आणि अधिकारा साठी ते शासन प्रशासन यांच्याशी नेहमी संविधानिक मार्गाने लढा देत असतात शिक्षण क्षेत्र आदिवासी समाज ,बंजारा , इतर बहुजन समाजाच्या शोषित यावर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवून न्याय देणारे विद्रोही लेखक वक्ता म्हणून त्यांची ख्याती आहे.सदर व्याख्यान हे” बाबासाहेब आंबेडकराना अपेक्षित असलेला भारत व सध्या संविधाना पुढील आव्हाने “या विषयावर हे व्याख्यान होणार असून जास्तीत जास्त जनतेने या व्याख्यानाचा लाभ घ्यावा अशा प्रकारची माहिती येथे गावातील आयोजक गोटू सोनवणे जेष्ठ नागरिक यांनी दिलेली आहे.या गावांमध्ये जाती जातींमध्ये सवर्ण दलित आदिवासी यामध्ये टोकाचा संघर्ष, वाद असून किसन सूर्यवंशी सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी काय भूमिका घेतात याचे तालुका प्रशासनाचे लक्ष लागून आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button