ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव ओबीसी जागा होईल तर देशाचा 10001% राजा होणार नापास होणं हा शिक्षणाचा अपमान नाही, परंतु CLASS – 1 ऑफिसर होऊन 12 वी फेल मंत्र्यांना साहेब साहेब म्हणावं लागणं, हा शिक्षणाचा 100% अपमान आहे 1)ओबीसींची जातीनिहाय जनगणना,2)UGC कायदा लागु करा व 3) २०११ पुर्वी लागलेल्या शिक्षकांना TET परिक्षेतुन वगळावे….. यासाठी जळगावातील महामोर्चात सामील व्हा..


दि-23 मार्च 2026 वार-सोमवार वेळ-दु.12 वाजता स्थळ-छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोर्टाजवळ जळगाव भारत मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय पिछडा ओबीसी वर्ग मोर्चा या सामाजिक स़ंघटनांनी भारतात चार चरणात आंदोलन घोषित केलेले आहे.त्यापैकी तिस-या चरणातील दि.23 मार्च 2026 रोजी स़ंपुर्ण भारतात प्रत्येक जिल्ह्यात जिल्हास्तरीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे….त्यामुळे जळगाव जिल्ह्यातही या मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे जळगावातील एस.सी एस.टी ओबीसी व सर्व शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांनी मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन. या मोर्चात जळगाव जिल्ह्यातील SC, ST, NT, DNT, OBC,शिक्षक व त्यांच्या कुटुंबीयांनी सहभागी व्हावे यासाठी आवाहन करण्यात येत आहे जळगाव शहरातील एन.रामाराव हौसिंग सोसायटी,बॅंक कॉलनी व निसर्ग कॉलनीत ठिबक प्रचार आज करण्यात आला..बहुजन क्रांती मोर्चाचे राज्य सहसंयोजक मा.सुमित्र अहिरे व मा.श्रीकांत तायडे सर यांनी पिंप्राळा उपनगरातील एन.रामाराव हौसिंग सोसायटी येथे घरोघरी जाऊन प्रचार केला पिंप्राळा उपनगरातील बॅंक कॉलनी व निसर्ग कॉलनी परिसरात मा.सुमित्र अहिरे साहेब व मा.अशोक तिडके साहेब यांनी ठिबक प्रचार केला या प्रचारात बहुजन समाजाचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे जळगाव जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांना आवाहन..जळगाव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांनी या मोर्चाच्या प्रचाराचा वेग वाढवावा व बहुजन समाजातील सर्व घटकांना ठिबक कॉर्नर मिटिंग घेऊन जागृत करावे व फिल्डवर्कचे सर्व अपडेट सोशल मिडियाच्या प्रत्येक प्लॅटफॉर्मवर टाकावेत असे आवाहन देवानंद निकम (जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा) सुनिल देहडे (जिल्हा प्रभारी आंदोलन समिती) सुभाष नावडे पाटील (जिल्हा अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)व वसंत कोलते (राष्ट्रीय ओबीसी मोर्चा)यांनी केले आहे


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button