ताज्या बातम्या

निर्भीड पत्रकार ते ग्रेट कलाकार (आर्टिस्ट) आबासाहेब… सूर्यवंशी राष्ट्रीय महासचिव आयडियल पत्रकार संघटना दैनिक प्रहार चाळीसगाव सूर्यकांत कदम


निर्भीड पत्रकार ते ग्रेट कलाकार (आर्टिस्ट) आबासाहेब… सूर्यवंशी सूर्यकांत कदम आजच्या युगात माणसाकडे वेळ नाही असे म्हटले जाते किंवा एखादा व्यक्ती त्याच्या जीवनात एखादं काम, व्यवसाय करू शकतो. त्यातही त्याला पुरेसा वेळ नसतो मात्र पाचोरा शहरांत एक अवलिया आहेत ते म्हणजे आबासाहेब सूर्यवंशी….
आबासाहेब गेल्या अनेक वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहेत. त्यांना लेखणीचा बादशाह, तसेच निर्भीड पत्रकार म्हणून त्यांना ओळखले जाते. त्यांच्या लेखणीने अनेकांचे धाबे दणाणले आहे. मात्र त्यांचा अजून एक गुण म्हणजे त्यांच्यात दडलेला मूळ कलाकार ( आर्टिस्ट) आहे. पत्रकारिता करत असताना त्यांनी त्यांच्यातला तीन पिढ्यातील कलाकार कधीच मागे पडू दिला नाही. ते आजही वेळात वेळ काढून ते आपली कला जोपासून आहेत. त्यांनी पाचोरा शहरासह पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, अन्य राज्यात पेंटिंग ची अनेक कामे केली असून त्यांच्या या कलेमुळे ते नेहमीच चर्चेत राहतात.
नुकतेच त्यांच्याकडे एक कलर काम आले…
एक पुतळा निर्जीव आणि खंडित अवस्थेत होता, त्यावर त्यांनी कलेच्या माध्यमातून रंग भरून त्या पुतळ्यात जीव ओतून विविध रंगांचा वापर करून त्या निर्जीव अवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या पुतळ्याला बोलके करून टाकले. आणि आज तो पुतळा जणू ओरिजनल असल्याचा भास होतो.
हिच कला आबासाहेब यांनी जोपासली आहे…
त्यांच्या पत्रकारितेला व त्यांच्या कलेला सलाम….
सूर्यकांत कदम…
राष्ट्रीय महासचिव – आइडियल पत्रकार संघटना (भारत),
दैनिक भास्कर, दैनिक प्रहार चाळीसगाव.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button