ताज्या बातम्या

कुल्फी कारखान्यावर पोलिसांची धाड; अन्न औषध प्रशासन विभाग निद्रावस्थेत मोठ्या प्रमाणात बनावट साहित्य जप्त अनेक शहरांमध्ये विमल माणिकचंद पानपरागं अनेक रासायनिक गुटख्यामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले गांजा चरस अफू यांचे मार्केटिंग जोरात अन्न औषध प्रशासन यांचे दुर्लक्ष आता तर मार्केटमध्ये डुबलीकेट पेढे सुद्धा येत आहे अतिशय गंभीर बाब अन्न व औषध विभागाच्या लक्षात येत नाही याचे कारण काय?


इगतपुरी तालुक्यातील डुबलीकेट कुल्फी तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांनी अचानक छापा टाकला गुप्त माहितीच्या आधारे टाकलेल्या छाप्यात कुल्फी तयार करण्यासाठी वापरले जाणारे धोकादायक साहित्य जप्त करण्यात आले आहे कार्यवाहीत केलेल्या अनेक वस्तू रासायनिक असल्याचा खुलासा झाला असून पोस्टर कलर चे डबे दोन चॉकलेट रंगीबेरंगी डबे आणि एक इसेन्सची बाटली कुल्फी बनवण्याचे अनेक प्रकारचे साहित्याचा फक्त करण्यात आलेले आहे प्राथमिक चौकशीत धक्कादायक बाब समोर आली आहे पाण्यात पोस्टर कलर मिळवून त्याला दुधाचा रंग दिला जात होता त्यानंतर त्या बनावट दुधात चॉकलेट रंगीबेरंगी कलर आणि इसेन्स टाकून कुल्फ्या तयार केल्या जात होत्या या बनावट कुल्फ्या तालुक्यातील ग्रामीण भागात शहरात रेल्वे स्टेशन बस स्थानक अशा अनेक ठिकाणी विकल्या जात होत्या अशी गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याची गंभीर खेळ होत असल्यामुळे नागरिक व लहान मुले सतत कुल्फी खाण्यामुळे आजारी पडत होते पोस्टर कलर आणि रासायनिक इसेन्स वापरून तयार केलेल्या कुल्फ्या मानवी शरीरास अत्यंत घातक असतात असे असूनही त्या कुल्फी कारखान्यावाल्याने आपला व्यवसाय अजून मोठा करून जनतेचे जीवाशी रोज खेळ करत होता याप्रकरणी विनोद प्रकाश कुशवाहा या संशयीताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून अन्न व औषध प्रशासन यांना माहिती देण्यात आली आहे आणि रासायनिक इसेन्स आणि रंगीबेरंगी कलर वापरून तयार केलेल्या कुल्फ्या इतर ठिकाणी सप्लाय केला जात होता का याचा तपास सुरू आहे जास्त नफा कमवण्यासाठी लोकांच्या व नागरिकांच्या जीवाशी खेळ केल्याची प्रतिक्रिया जनता नक्की आवाजात बोलत होती जनतेच्या जीवाशी असे प्रकार प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात सुरू असून अन्न व औषध प्रशासन हा विभाग कधी लक्ष देणार अन्न व औषध प्रशासन यांनी प्रत्येक ठिकाणी जाऊन नमुने घेऊन लॅबला पाठवले तर असे प्रकार घडणार नाही अन्न व औषध प्रशासन या गोष्टीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहे विमल गुटखा ताडी गावठी दारू यांच्यात रासायनिक प्रक्रिया केली जाते असे अनेक प्रकारचे रासायनिक घटक दलाल लोक मिसळतात आणि वाम मार्गाने पैसा कमवतात आणि जनतेच्या जीवाशी खेळतात ते काय फुकट देतात का जनता पैसे देते आहे कष्टाचे आणि हे चोर हरामाचे पैसे कमवतात दुसऱ्या राज्यात येऊन


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button