Maharashtra जालन्यात चेकपोस्ट नाक्यावर ट्रक चालकाचा मृत्यू आरटीओ पोलीस अधिकाऱ्यांवर मुलाचा गंभीर आरोप आरटीओच्याच दमदाटीने माझ्या वडिलांचा मृत्यू झाला

संपूर्ण भारतात जो तो आपला उदारनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करत असतात त्यातच काही गाडी चालवून उदरनिर्वाह करतात काही ट्रक ड्रायव्हर तर काही हमाली काम करून आपला उदरनिर्वाह करत असतात जालना एमआयडीसी मध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून म** खरेदी-विक्री होत असतो रोजच राज्यातून हजारो ट्रक मालवाहतूक करत असतात त्यातच ट्रक चालवणारे ड्रायव्हर चालक-मालक कोसो दूर आपला उदरनिर्वाह करण्यासाठी मालवाहतूक करत असतात ट्रक चालकांना कधी आराम नसतो कारण फार मोठा रनवे त्यांच्यासाठी असतो तो पार करण्यासाठी जीवाची धडपड करत असतात त्याशिवाय पैसे भेटणार नाही या हिशोबाने जीवाची पर्वा न करता रात्रंदिवस गाडी चालवत असतात ट्रक मधील म** व्यवस्थित ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना काळजी असते ट्रक ड्रायव्हर मोहम्मद आयुब मोहम्मद मतीन वय वर्ष 48 हा अकोल्याहून म** घेऊन दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी 7वाजेच्या सुमारास आला ट्रक चालकाची ही शेवटची वेळ आहे हे त्याला सुद्धा माहीत नव्हते शनिवारी वेळ सायंकाळी 7 वाजता अकोला खामगाव शिंदखेडा राजा ते जालना समृद्धी मार्गे जालना एमआयडीसी मध्ये ट्रक घेऊन गेले असता मात्र त्या क्षणी उपस्थित असलेल्या आरटीओच्या चेक पोस्ट अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी थांबवले आणि कागदपत्रांची विचारपूस केली ट्रक मध्ये काय म** आहे कुठे जाणार आहे याची विचारपूस करायला सुरुवात केली विचारणा केल्यानंतर मोहम्मद मतीन ड्रायव्हर घाबरले त्याचवेळी मोहम्मद मतीन यांना चक्कर आली आणि अचानक जमिनीवर खाली कोसळले त्यावेळेस त्यांचा 20 वर्षाचा मुलगा सोबत होता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या काही ट्रक चालक-मालक यांनी आरटीओ च्या गाडीत तत्काळ जिल्हा रुग्णालयात घेऊन गेले उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी मोहम्मद मतीन यांना मृत घोषित केले आपले वडील आपल्याला सोडून गेले आई कोसो दूर वडिलांची अशी परिस्थिती पाहून त्यांच्या वीस वर्षीय मुलाने टाहो फोडला यावेळी ही घटना संपूर्ण शहरात पसरली सगळेच ट्रक चालक मालक जिल्हा रुग्णालयात पोहोचले पोलीस आले त्यानंतर तपास सुरू झाला ट्रक चालक मोहम्मद मधील यांच्या मुलाने आरोप केला आहे माझ्या वडिलांचा मृत्यू आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या दमदाटीमुळे झाला ट्रक अडवताना उभे असलेले आरटीओ अधिकारी व निरीक्षक भागवत बाविस्कर व त्यांचा सरकारी वाहनचालक पाटील यांच्या दमदाटीमुळे माझ्या वडिलांचा मृत्यू झाला संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी या 20 वर्षे तरुणांनी केली आहे ट्रक चालकाच्या मुलाच्या तक्रारीनुसार जिल्हा ग्रामीण रुग्णालयाच्या पोलीस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आला या संपूर्ण घटनेमुळे ट्रक चालक-मालक संघटना आक्रमक झाले असून त्यांची मागणी संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करा ही मागणी लावून धरली








