ताज्या बातम्या

कर्तृत्वाने उजळलेले यशाचे सोनं –म्हणजेच संधीच सोन करणे होय डॉ. कादंबरीचा अभिमानास्पद प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण शिक्षणाचा प्रवास MGM मेडिकल कॉलेज नवी मुंबई


नवी मुंबई – विद्यार्थीदशेतून डॉक्टर होण्याचा प्रवास म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर त्या ज्ञानाला अनुभव मूल्यं कलेची जाण नेतृत्वगुण आणि मनुष्यत्वाची किनार लाभलेली असते. अशा सशक्त प्रवासाची जिवंत, प्रेरणादायी आणि भावनिक कहाणी लिहिली आहे डॉ. कादंबरी हिने – जिने MGM Medical College and Hospital, Kamothe, Navi Mumbai या देशातील एक मान्यताप्राप्त वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत आपल्या Bachelor of Physiotherapy (BPT) पदवीच्या अंतिम वर्षातही अत्युत्कृष्ट A+ ग्रेड मिळवून आपल्या शैक्षणिक यशाचा शिखर गाठला आहे तिच्या या यशाने केवळ तिचे आई-वडील नव्हे, तर संपूर्ण कुटुंब शिक्षकवर्ग आणि जिल्हाभरात तिचे नाव घेताना अभिमानाने उर भरून येतो आहे दि. ७ मे २०२५ रोजी BPT च्या अंतिम वर्षाचा निकाल घोषित झाला आणि त्यामध्ये डॉ. कादंबरीने सलग चार वर्षांत प्रत्येक विषयात मिळवलेले A+ ग्रेड हे तिच्या परिश्रमाचे सातत्याचे आणि शिस्तबद्ध जीवनाचे खरेच जिवंत प्रतीक ठरले या पदवीच्या टप्प्यावर येईपर्यंतचा तिचा प्रवास अनेक पैलूंनी समृद्ध आहे अभ्यास क्रीडा सांस्कृतिक सहभाग नेतृत्व सामाजिक जाणीवा आणि संवेदनशीलतेच्या या एकत्रित प्रवासात कादंबरीने प्रत्येक भूमिका लीलया पेलली आहे खरं तर तिच्या बहुआयामी कर्तृत्वाची बीजे तिच्या शालेय जीवनातच रोवली गेली होती. पाचोरा येथील निर्मल इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिने राष्ट्रीय स्तरावरील खो-खो संघाचे कर्णधार पद भूषवले होते ही बाब तिच्या नेतृत्वगुणांची शारीरिक क्षमतेची आणि संघभावनेच्या जाणिवेची ठोस साक्ष देणारी आहे शालेय वयातच संघ बांधणी संयमित आक्रमकता आणि जबाबदारीने संघाचे नेतृत्व करण्याची गुणवत्ता तिने दाखवून दिली होती ही क्रीडा पार्श्वभूमी तिच्या वैद्यकीय शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर उपयोगी ठरली तिच्या शालेय आयुष्याची ही भक्कम पायरी पायवाट होऊन तिला MGM Medical College and Hospital, Kamothe या देशातील नामवंत संस्थेत वैद्यकीय शिक्षण घेण्याची संधी मिळाली पण ती संधी घेऊन केवळ अभ्यासावर भर न देता तिने शिक्षणात उत्कृष्टता साधतानाच आपली कला नेतृत्व वाणी आणि सामाजिक समज या प्रत्येक अंगाला योग्य तो न्याय दिला
देशासाठी काहीतरी करून दाखवण्याची उर्मीच तिचं यश दीर्घकाळ टिकवून ठेवेल ध्येय न्यूज परिवार ‘झुंज’ साप्ताहिक व पाचोरा परिसरातील संपूर्ण वाचकवर्गाकडून डॉ. कादंबरीला मनःपूर्वक शुभेच्छा तुझ्या यशाचा आणि कर्तृत्वाचा प्रकाश असाच नवनव्या दिशा उजळवत राहो


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button