ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा राणीचे बांबरुड उच्च माध्यमिक हायस्कूल यशाची परंपरा राखून नावलौकिक वाढवा शिक्षणाशिवाय पर्याय नाही माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ


तालुका पाचोरा जिल्हा जळगाव विद्यार्थ्यांनी यशस्वी उज्वल परंपरा कायम राखून शाळेचा व तालुक्याचा नावलौकिक वाढवावा असे प्रतिपादन माजी आमदार भाऊसो दिलीप वाघ यांनी राणीचे बांबरुड येथील डॉ; राम मनोहर लोहिया माध्यमिक उच्च माध्यमिक महाविद्यालयात इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना निरोप देताना आपली महत्वपूर्ण वाक्य विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उद्गारले पुढे असे म्हणाले की माझे सुद्धा शिक्षण सामनेर या ठिकाणी झालेले आहे म्हणून आमच्या वेळेस शाळेमध्ये शाळेत शिकवलेला अभ्यास विद्यार्थी पूर्ण करून शाळेत आला नाही तर शिक्षा मिळतच असे त्यामुळे त्यावेळेसचा पहिलीतला विद्यार्थी आज दहावीतल्या मुलांची बरोबरी करू शकतो म्हणून विद्यार्थ्यांनी शाळेत शिकवलेला अभ्यास नियमित पाठांतर केले तर परीक्षेच्या वेळेस पेपर कठीण जात नाही या वर्षापासून सरकारने नवीन नियम टाकले असून कॉफी मुक्त परीक्षा त्यामुळे विद्यार्थ्यांनी आतापासूनच अभ्यासाच्या तयारीला लागाव असे उद्गार माजी आमदार संस्थेचे अध्यक्ष दिलीप भाऊ वाघ यांनी काढले यावेळी गो से हायस्कूलचे सेवानिवृत्त पर्यवेक्षक शांताराम चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले ते म्हणाले की विद्यार्थ्यांनी वेळेचे नियोजन करून आत्मविश्वासाने परीक्षेत सामोरे जावे तसेच एम एम महाविद्यालयातील प्राध्यापक डॉक्टर अतुल सूर्यवंशी यांनी इंग्रजी विषय कसा असतो तो कसा आत्मसात करावा याचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करून दिले इंग्रजी फार सोपा विषय असतो इंग्रजीचां विषय मनात भीती बाळगू नका एबीसीडी पासूनच इंग्रजी तयार झालेली आहे एबीसीडी पाठ करा अनेक महान महापुरुष भारतात इंग्रजी शिकून जगामध्ये प्रत्येक परिस्थितीला सामोरे गेले कारण जगामध्ये इंग्रजी बोलल्यामुळेच देशाची पावर वाढते याप्रसंगी संस्थेचे चेअरमन संजय नाना वाघ सरपंच बुरहान तडवी उपसरपंच प्रमोद वाघ पंचायत समिती सदस्य ललित भाऊ वाघ मनोज वाघ शशिकांत वाघ प्रदीप वाघ पर्यवेक्षक जी एन पाटील बाविस्कर माणिकराव शिंदे झुंबर शेठ उपस्थित होते


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button