ब्रेकिंग न्यूज जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध..पारोळा येथील गुटख्याची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून विक्रेत्यांनी केली पत्रकार विकास चौधरी यांना बेदम मारहाण गुटखा विकणाऱ्यांनी आता सगळ्या लाजा सोडल्या कमरेच सोडून डोक्याला बांधलं गुटखा विकणाऱ्यांना मुलबाळ नाहीत का दुसऱ्यांच्या मुलाबाळांच्या जिंदगी खराब करून स्वतः पैसा कमवत आहे थोड्याफार लाजा वाटू द्या रे गुटखा विकणाऱ्यांनो जो चांगलं काम करत आहे त्याला मारत आहे कुठे गेले कायदे रक्षक झाले का भक्षक आमच्या पत्रकारांवर अन्याय होतो प्रत्येक वेळेस का सहन करायचा? जो चांगलं काम करेल तो जेलमध्ये जाईल वारे वा

आपल्या देशात राज्यात जिल्ह्यात जो चांगलं काम करेल तो जेलमध्ये जाईल आणि हे दोन नंबर धंद्यावाले अधिकारी यांच्या मांडीला मांडी लावून समोरच्या खुर्चीवर बसतील कुठे गेला कायदा पैसा भेटला म्हणजे कायदा कुठे जातो फक्त फायदा आणि फायदा कुठे रक्षक कुठे काही अधिकारी तर असे सुद्धा सांगतात पत्रकार आता भरपूर झाले मग दोन नंबर धंदे करणारे कमी झाले का पत्रकारांच्या नावाने बोंबाबोंब करतात आणि दोन नंबर धंद्यावाल्यांच्या अधिकारी कधीच बोंब मारत नाही उलट त्यांची बाजू धरतात कारण तिथून गुलगुला भेटतो पत्रकारांकडून काय भेटणार पत्रकार तर चांगले काम करत असतात पण नेहमी आमच्या पत्रकार बांधवावर वाईट सूटबुद्धीने काटा काढतात त्यांना पाठबळ देणारे कोण? आणि काय हरामाची कमाई करून काय बरोबर घेऊन जाणार आहे का मसनवटीत फक्त चार लाकडं दोन गौर्या बरोबर काही येत नाही भारतात बेरोजगारी असल्यामुळे नाईलाजाने पत्रकारांची मजबुरी आणि त्या मजबुरीचा फायदा हे अधिकारी वर्ग घेत असतात आणि काही अधिकारी दोन नंबरचा धंदा करून मुला बाळांना बायकोला पोसत असतात त्याबरोबर अधिकारी वर्ग यांना पगार असून सुद्धा पैसे घेतात मग पत्रकार जास्त झाले पत्रकारांच्या नावाने बोंबाबोंब करतात वारे वा सरकार पारोळा येथील लाईव्ह ट्रेड चे पत्रकार विकास चौधरी यांना गुटखा विक्रेत्यांनी केली बेदम मारहाण… पत्रकार चौधरी गंभीर जखमी..सदर घटनेचा पत्रकार संरक्षण समिती जळगाव तर्फे जाहीर निषेध… जाहीर निषेध…सगळ्या पत्रकारांनी मिळून एसपी ऑफिस वर मोर्चा काढावा लागणार आहे त्याशिवाय हे शांत बसणार नाही











