जिल्हा अहिल्यानगर कोपरगाव तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई पाईपलाईनची गळती असे अनेक आरोप प्रत्यारोप पाणीपुरवठा विभाग नगरपालिकेवर होत आहे 4 दिवसांनी मिळणारे पाणी थेट 6 सहाव्या दिवशी नागरिकांना मिळत आहे वैशाली वाजे पाणीपुरवठा सभापती कोपरगाव

कोपरगाव नगर परिषदेचा कारभार चव्हाट्यावर नागरिकांना 4 दिवसानंतर मिळणारे पाणी आता 6 सहाव्या दिवशी मिळत असून पाईपलाईनला होणारी गळती आणि दुसरीकडे पाण्याच्या टाक्या ओव्हर फ्लो होऊन पाणी वाया जात आहे एकीकडे शासन सांगते की पाण्याचा वापर जपून करा आणि इकडे लाखो लिटर पाणी वाया जाते त्याचं काय असा विषय चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र वाकचौरे यांनी कोपरगावच्या सत्ताधारी गटाला प्रश्न विचारला त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा होईल असे चिन्ह दिसत आहे अनेक ठिकाणी राज्यात पाऊस नाही त्यामुळे येणाऱ्या काळात पाणी प्रश्न हा मोठ्या प्रमाणावर उद्भवेल पावसाचा अंदाज आतापर्यंत फेल गेला आहे त्यामुळे जलसंपदा विभागाने शेती सिंचनाचे पाणी थांबवून ते पिण्याच्या पाण्यासाठी शिल्लक राहू दिले आहे कोपरगावच्या अनेक ग्रामीण भागात पाण्याची समस्या बिकट झाली असून पाणी कमी होत असून नगरपालिकेने पाणीपट्टी आणि घरपट्टी वाढवण्याचा बजेट मंजूर केला राष्ट्रवादी अजित पवार गटाने हाच मुद्दा उचलून या प्रश्नावर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली आहे याबाबत कोपरगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते राजेंद्र वाघचौरे यांनी आरोप करून आरोपांचा पाढा सुरू केला आहे















