ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका भुसावळ येथील प्रभाग क्रमांक 17 तील करदाते रहिवाशी शिष्टमंडळने न, पा.आरोग्याधिकारी यांना समस्यांचे निवेदन सादर केले असून त्याची प्रत मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रभारी नगराध्यक्षा शैलजा ताई नारखेडे सत्ताधारी गट नेते युवराज लोणारी यांना देण्यात आले आहे.


सदर निवेदनात म्हटले आहे की आम्ही नियमित करभरणारे करदाते असून आपणास तोंडी लेखी व पत्रांद्वारे कळवून सुद्धा आश्वासनाची भीक आमच्या पदरात टाकलेली आहेत.तसेच आमच्या मागणी कडे नेहमी कानाडोळा व अक्षम्य दुर्लक्षच करण्यात आले व याची प्रचिती आम्हास आलेली आहेत. आता हे शेवटचे निवेदन असून आतातरी प्रभागातील तुडुंब सर्व गटारी भरलेल्या असल्याने दुर्गंधी व मच्छर – डासांचा उच्छाद निर्माण झाल्याने प्रभागातील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात आले असून दररोज मुले,बालके, वृद्ध,आया बहिणी आजारी पडत आहेत .तरी निवेदनाची दखल घेऊन प्रभागात एक दिवस पाहणी केलीत तर वस्तुस्थिती दिसून येईल प्रभागातील सर्व गटारीतून गाळ काढून नियमित सफाई करावी व कीटक नाशक औषधी व 15 दिवसा आड धूर फवारणी करण्यात यावी.जेणे करून रहिवाशांचे आरोग्याचा प्रश्न उपस्थित होणार नाहीत.जर या कडे दुर्लक्षित केले गेले. आणि या दरम्यान एखाद्या रहिवाशीचे आरोग्य गंभीर झाल्यास व अनुचित काही घडले तर आपण आरोग्य अधिकारी म्हणून आपणास जबाबदार समजून आपल्या वरती कायदेशी कारवाई करण्यात येईल व आपणच याचे जबाबदार असणार असेही विनंती वजा चेतावणी प्रभाग क्रमांक 17 तील करदाते व रहिवाशी शिष्टमंडळ तर्फे देण्यात आले आहेत.

{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”f8d683c2-be46-404a-af57-33742e3ebf73″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”f8d683c2-be46-404a-af57-33742e3ebf73″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};
{“AIGC”:{“ContentPropagator”:”001191441900557262083U10400″,”Label”:”1″,”ReservedCode1″:””,”ProduceID”:”e9e3381d-6a81-4132-a4ba-e9c5092fb6a5″,”ReservedCode2″:””,”PropagateID”:”e9e3381d-6a81-4132-a4ba-e9c5092fb6a5″,”ContentProducer”:”001191441900557262083U10400″}};

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button