जळगाव जिल्ह्यात MCL इलेक्शन मध्ये घोडेबाजार वेगवान पद्धतीने सुरू आहे घोडेबाजार म्हणजे काय? सत्तेसाठी किंवा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आमदार खासदार किंवा इतर नेत्यांना पैसे दाखवून किंवा दबाव आणून फोडणे होय? विधान परिषदेच्या निवडणुकीत बंडखोरीमुळे एका मतासाठी. 25 ते 30 लाख रुपये पर्यंत एका मतासाठी व्यवहार होऊ शकतो?

जिल्हा जळगाव विधान परिषदेच्या MCL इलेक्शन फॉर्म भरल्यानंतर माघारी साठी 4/6/2026 या तारखेला 12 उमेदवारांची माघार झाली रिंगणात 4 उमेदवार आणि त्यातही बंडखोरी त्यामुळे सध्या जळगाव जिल्ह्याच्या विधान परिषदेची निवडणुक अतिशय अटीतटीची होणार असून त्यातच घोडेबाजार सुरू झालेला आहे निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात भाजप आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या थेट सामना पहावयास मिळणार आहे युती ठरल्यानंतरही शिवसेनेच्या उमेदवाराने उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे समीकरणे बदलली शिवसेनेच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी अपक्ष फॉर्म भरला त्यामुळे निवडणूक अतिशय अटीतटीची होणार या दोन्ही उमेदवारामुळे मतांचे विभाजन होणार आणि पैशाचा चुराडा होणार यात शंका नाही आता संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे लक्ष जळगाव जिल्ह्याकडे लागलेले आहे यंदाची जळगाव जिल्ह्याची निवडणूक हा फार मोठा चर्चेचा विषय होणार त्यात एका मताला लाखो रुपयांचा भाव फुटला हा भाव अजून वाढूही शकतो त्यामुळे निवडणूक अटीतटीची होणार











