जळगाव शहरात विजेचा ओव्हर लोड टाळण्यासाठी महापौरांचा पुढाकार 5 नवीन सबस्टेशन उभारणीसाठी हालचालींना वेग विजेचा ओव्हर लोड कमी करण्यासाठी जळगाव महापौर दीपमाला काळे यांनी महानगर पालिकेच्या बैठकीत बोलताना सांगितले

जळगाव शहरात विजेचा ओव्हर लोड टाळण्यासाठी महापौर दीपमाला काळे यांनी सोमवारी (दि. ४ मे) एका महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन केले होते. विजेची समस्या सोडवण्यासाठी शहरात प्रस्तावित असलेल्या ५ नवीन सबस्टेशनच्या उभारणीबाबत या बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.या बैठकीस महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता दत्तात्रय साळी, कार्यकारी अभियंता जी. टी. महाजन, अधिकारी अजय वाणी, देवेंद्र भंगाळे, चेतन सोनार यांच्यासह महानगरपालिकेचे विद्युत विभागाचे अधिकारी संदीप मोरे उपस्थित होते बैठकीतील महत्त्वाचे मुद्दे प्रस्तावाला मंजुरी मात्र कार्यवाही रखडली: जळगाव शहरात ओवर लोड करिता महावितरण विभागाने यापूर्वीच काही सबस्टेशनचे प्रस्ताव दिले होते. या वाढीव सबस्टेशनच्या प्रस्तावांना मंजुरीही मिळाली होती मात्र मागील प्रशासकीय कार्य काळात या संदर्भात कोणतीही कार्यवाही झाली नव्हती.समन्वयाचा अभाव: महावितरण आणि महानगरपालिका यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे प्रलंबित असलेल्या कामांचा फटका नागरिकांना बसत होता आणि विजेच्या तक्रारींमध्ये वाढ झाली होती.जागांची पाहणी: या समस्येवर तोडगा काढण्यासाठी महापौरांनी महापालिकेकडून सबस्टेशनसाठी काही पर्यायी जागांची नावे उपलब्ध करून दिली आहेत. या जागांची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत महापालिका आणि महावितरणचे प्रतिनिधी संयुक्त भेट देणार आहेत.निर्णय प्रक्रिया: जागेच्या पाहणीनंतर लगेचच सब स्टेशनच्या उभारणी बाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असे महापौरांनी स्पष्ट केले शहरातील विजेचे प्रश्न सोडवण्यासाठी हे पाऊल अत्यंत महत्त्वाचे असून यामुळे नागरिकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे












