ताज्या बातम्या

जिल्हा जळगाव तालुका पाचोरा पोलिसांकडून गंभीर तक्रारीची दिशाभूल; लोकशाही दिनी जिल्हा _धिकाऱ्यांकडे न्यायासाठी धाव! सामाजिक कार्यकर्ता पंकज राजेंद्र पाटील


जळगाव:पाचोरा पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल केलेल्या एका गंभीर तक्रारीत वस्तुस्थिती दडवून तपास अधिकाऱ्यांनी दिशाभूल करणारा अहवाल सादर केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे याप्रकरणी तक्रारदार श्री. पंकज राजेंद्र पाटील (रा. तारखेडा खु!) यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित ‘लोकशाही दिन’ उपक्रमात प्रत्यक्ष हजर राहून जिल्हाधिकारी साहेबांकडे दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची मागणी केली आहे.नेमके प्रकरण काय? तक्रारदार पंकज पाटील यांनी ‘आपले सरकार’ पोर्टलवर (टोकन नं. TAL/HOMD/PACH/2026/5) पुराव्यानिशी तक्रार दाखल केली होती मात्र पाचोरा पोलीस स्टेशनच्या संबंधित तपास अधिकाऱ्यांनी मूळ विषयाला बगल देत, इतर प्रकरणांचा संदर्भ देऊन तक्रार दप्तरी दाखल (File Closure) केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. वारंवार हरकती नोंदवूनही (उदा. तक्रार क्र. २०२६८४२२९१६) पोलिसांकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही.कायद्याचे आणि नियमांचे उल्लंघन:जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या अर्जात तक्रारदाराने खालील महत्त्वाचे कायदेशीर मुद्दे उपस्थित केले आहेत पोलीस मॅन्युअल नियम १६५ चा भंग: तक्रारीची वस्तुनिष्ठ चौकशी न करणे हे पोलीस मॅन्युअलमधील कर्तव्यात कसुरीचे लक्षण आहे.ललिता कुमारी विरुद्ध उ.प्र. सरकार: माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या या ऐतिहासिक निकालाचा हवाला देत, दखलपात्र अपराध असल्यास FIR नोंदवणे बंधनकारक असतानाही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम: चुकीचा अहवाल सादर करून वरिष्ठांची दिशाभूल करणे हा गंभीर गैरप्रकार असून दोषींवर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.मुख्य मागण्या:1) पाचोरा पोलिसांच्या दिशाभूल करणाऱ्या अहवालाची वरिष्ठ स्तरावरून चौकशी व्हावी 2) कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित पोलीस अधिकारी/कर्मचारी यांच्यावर तातडीने शिस्तभंगाची कारवाई व्हावी.3) मूळ तक्रारीची निपक्षपातीपणे चौकशी करून तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करावा या प्रकरणी आता जिल्हा प्रशासन आणि पोलीस अधीक्षक कार्यालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे सामान्य नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करून जर पोलीसच गुन्हेगारांना पाठीशी घालत असतील, तर न्याय कुणाकडे मागायचा?” असा संतप्त सवाल सामाजिक कार्यकर्ते पंकज पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना उपस्थित केला.


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button