तक्रारदार तथा माहिती अधिकार कार्यकर्ता व सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील पाटील यांची संघर्षची सुमारे 50 महिन्यांची लढाई यशस्वी जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील सरकारी गायरान जमीन सर्व क्रमांक 84 आणि गट क्रमांक 140 चे बखळ प्लाट नमुना नंबर 8 वर नावे लावुन तसेच सरकारी गायरान जमीन चे बनावट कागदपत्रे व सही शिक्के तयार करून पिंपरी मोंढाळे येथील अनेक सरपंच व अनेक ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक व उपसरपंच व शिपाई व पाणीपुरवठा कर्मचारी सह यांनी पुर्व नियोजित कारस्थान रचुन सर्वांनी संगनमताने शासनाच्या मालकीची जमीनचे एकुण 22 विक्री गैरव्यवहार व सुची व दस्तावेज खरेदी विक्री परस्परांना विक्री गैरव्यवहार महा घोटाळा उघडकीस

या प्रकरणात जळगाव जिल्हाधिकारी व दंडाधिकारी आदरणीय महोदय रोहन घुगे साहेब आणि जळगाव महसूल प्रशासनाची कडक कारवाई व प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तसेच संबंधित सरपंच व ग्रामसेवक व ग्रामरोजगार सेवक व शिपाई आणि प्रभारी सरपंच सह तसेच गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांच्या वर प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत फोजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश!पारोळा तालुक्यातील मौजे पिंप्री प्र.उ. येथील गायरान जमिनींवरील बनावट कागदपत्रे व सहि शिकके तयार करून सरकारी जमीन गैरव्यवहार अखेर उघडकीस आला असून,या प्रकरणात सातत्याने पाठपुरावा करणारे तक्रारदार सामाजिक कार्यकर्ता गुलाबराव जगन्नाथ पाटील यांच्या संघर्षाला मोठे यश मिळाले आहे.तक्रारदार यांच्या विरुद्ध हरामखोर सरपंच व काही हरामखोर ग्रामसेवक यांनी संगनमताने आरोपीच्या पत्नी ला हाताशी धरून तक्रार दारांवर खोटा विनयभंग व अनुसुचित जाती व जमाती कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला होता तसेच इतर ही 3/ 4 खोटे गुन्ह्यांमध्ये अडकण्याचे कारस्थान पारोळा व अमळनेर येथील उपविभागीय पोलिस अधिकारी राकेश जाधव आणि सुनील नंदवाळकर व पोलिस हवालदार प्रकाश दामोदर चव्हाण व पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे आणि पोलिस निरीक्षक सुनील पवार सह यांच्या मार्फत लाखो रुपयांची लाच देऊन कट कारस्थान रचले गेले होते तक्रारदाराने जिद्द चिकाटी सोडली नाही जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार झालेल्या चौकशीत गंभीर अनियमितता समोर आल्याने संबंधितांवर कठोर कारवाईचे निर्देश देण्यात आले आहेत.गेल्या काही वर्षांपासून गायरान/गुरचर जमिनींची बेकायदेशीर खरेदी-विक्री,अतिक्रमण आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे व्यवहार होत असल्याचा मुद्दा गुलाबराव जगन्नाथ पाटील यांनी सातत्याने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला होता. त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळेच उपविभागीय अधिकारी एरंडोल यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली.समितीच्या तपासात धक्कादायक बाबी समोर आल्या असून, पिंपरी मोंढाळे येथील तात्कालीन ग्रामसेवक 1) डि.बी.पाटील 2) महेंद्र भानुदास सोनवणे 3)एन.आर.चंंदरै 4) कै.दिलिप काशिराम पाटील 5) राजेंद्र विनायक सोनवणे 6) हरिभाऊ मारवडकर 7) जगदीश बावीस्कर तसेच तात्कालीन सरपंच 1)राजेंद्र भिमराव पाटील 2) कैलास राघो पाटील 3)मिराबाई कैलास पाटील 4) गंभीर नत्थु पाटील 5) लताबाई राजेंद्र पाटील 6) राजेंद्र भगवान पाटील 7) विजय भावराव पाटील 8)गोकुळ ओंकार विसावे गा.पं.शिपाई 9) युवराज नारायण विसावे पाणीपुरवठा कर्मचारी 10) राजेंद्र आनंदा विसावे रोजगार सेवक पिंपरी मोंढाळे 11) प्रभारी सरपंच .पुष्पा रामकृष्ण पाटील तसेच तात्कालीन उपसरपंच व सदस्यांनी आणि 30 ते 40 भुमाफियांनी मोजे पिंपरी मोंढाळे येथील सर्व क्रमांक 84 आणि गट क्रमांक 140 हया सरकारी जमिनी 8 अ. चार बनावट उतारा तयार करून स्वतःच्या नावावर दाखवून दुय्यम निबंधक कार्यालय पारोळा येथील कार्यालयात खरेदी विक्री व्यवहार केल्याचे स्पष्ट झाले आहे.तसेच सरकारी गायरान जमीन वर अनाधिकृत बांधकामे व शेततळे व पोल्ट्री फार्म उभारण्यात आलेल्या आहेत अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण करून जमिनींचा बेकायदेशीर वापर झाल्याचेही आढळून आले आहे पार्श्वभूमीवर सर्व सरपंच उपसरपंच ग्रामसेवक व सदस्य आणि भुमाफिया व साक्षीदार सह सर्व संबंधितांविरुद्ध शासन निर्णय व कायदा कलमां. मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव आणि गटविकास अधिकारी पंचायत समिती कार्यालय पारोळा यांना फोजदारी कारवाई व प्रशासकीय कारवाई व दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांनी आदेश दिले आहेत पोलीस तक्रारी दाखल करण्याचे तसेच महसूल नोंदींची सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत याशिवाय काही प्रकरणांमध्ये भारतीय दंड संहितेनुसार गुन्हे नोंदविण्यात आले असून उर्वरित प्रकरणांमध्ये तहसीलदारांना स्वतंत्र प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.गरज भासल्यास संबंधित जमिनी पुन्हा सरकारी ताब्यात घेण्याची प्रक्रिया तातडीने राबविण्यात येणार आहे.पारोळा तालुक्यातील पिंपरी मोंढाळे येथील ग्रामपंचायत सदस्य गुलाबराव जगन्नाथ पाटील या, एका सामान्य नागरिकाच्या चिकाटीमुळे सततच्या पाठपुराव्यामुळे एवढा मोठा सरकारी गायरान जमीन खरेदी विक्री संंधित एकुण 22 खरेदी विक्री दस्तावेज गैरप्रकार उघडकीस आल्याने स्थानिक पातळीवर सत्याचा विजय झाला आणि पारोळा शहरात व बोरि परिसरात जन सामान्य माणसाला मनात समाधान व्यक्त होत आहे.या प्रकरणात जळगाव जिल्हाधिकारी रोहन घुगे साहेब यांच्या आदेशाने गटविकास अधिकारी आणि पारोळा तहसीलदार यांना तत्वर कारवाई करण्यास आदेशीत करण्यात आले आहे तसेच सरकारी गायरान जमीन वरिल अतिक्रमणे निष्कासित करण्याचे आदेश दिले आहेत तसेच गटविकास अधिकारी संजय तुकाराम मोरे यांनी चोकशी कामी समितीच्या अधिकार यांना व महसूल विभाग यांना सहकार्य न केल्याने संबंधित विरूद्ध प्रशासकीय कारवाई करण्याचे आदेश दिले आहेतप्रशासनानेही या प्रकरणात शून्य सहनशीलतेची भूमिका घेत भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्याचा इशारा दिला आहे.











